तहसीलदार, पोलीस अधिकारी आणि मुख्याधिकारी यांची संयुक्त कार्यवाही
७८ जणां विरुद्ध दंडात्मक कार्यवाही!!
--------------------------------------------------
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
केज येथे महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि नगर पंचायत यांनी कोरोनाच्या ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केज येथे विनामास्क फिरणारे पादचारी आणि वाहन चालक यांच्यावर दंडात्मक कार्यवाही केली. या कार्यवाहीत तहसीलदार दुलाजी मेंडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, नायब तहसीलदार सचिन देशपांडे, आशा वाघ-गायकवाड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अशोक साबळे हे स्वतः सहभागी होत त्यांनी कारवाई केल्या. ७८ नेव जणाविरुद्ध कार्यवाही करून १५ हजार ८०० रु दंड जमा केला आहे.
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी म्हणून दि. ११ जानेवारी रोजी केज येथील शिवाजी चौक आणि बस स्टँड समोर विनामस्क फिरणारे पादचारी आणि वाहनचालक यांच्यावर तहसिलदार दुलाजी मेंडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, नायब तहसीलदार सचिन देशपांडे, आशा वाघ-गायकवाड आणि केज नगर पंचायतचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून दंड केला. यावेळी ७७ जणांच्या विरुद्ध कार्यवाही करीत त्यांच्या कडून १५ हजार ८०० रु. दंड वसूल केला.

