shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेतकऱ्यांची अडवणूक थांबवा अन्यथा महावितरणवर मोर्चा ;भाजपा नगर तालुक्याच्या वतीने गंभीर इशारा

प्रतिनिधी : बाबासाहेब तिपुळे

नगर : ११  /  गेल्या काही दिवसांपासून महावितरणकडून नगर तालुक्यातील शेतकऱ्यांची जाणीवपूर्वक होत असलेली अडवणूक ८ दिवसांच्या आत थांबवावी अन्यथा भाजपा नगर तालुक्याच्या वतीने महावितरण कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी आज महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री.लहामगे यांना निवेदनाद्वारे दिला .

यावेळी जेष्ठनेते माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड सर, युवराज पोटे, रमेश पिंपळे, शामराव पिंपळे, तालुका सरचिटणीस बाबासाहेब काळे, गणेश भालसिंग, तालुका उपाध्यक्ष पोपट शेळके, सागर भोपे, बबन शिंदे, महेश लांडगे, गोवर्धन शेवाळे, किशोर गायकवाड, पोपट बनकर, आनंदा साठे यांच्यासह नगर तालुक्यातील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close