प्रतिनिधी : आसावरी वायकर
नगर : २७ / देशभरात उत्साहात साजरा होणारा दिवस म्हणजे २६ जानेवारी .हा आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत असतो. आज आपला ७३ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त दक्ष पोलिस मित्र संघटनेचे पोलिस मित्र जवानांनी तिरंगा झेंडा सलामी देऊन अध्यक्ष शहादेव मुंगसे यांच्या हस्ते हस्ते झेंडावंदन करण्यात आले.
भारत देशातील लोकशाही ७३ वर्ष यशस्वीरित्या लोकशाही जनतंत्र पुर्ण झाले. जगभरात सर्व श्रेष्ठ लोकतंत्र भारत देशात आहे.हे अनेक देशांनी तज्ञ मान्य देखील केलं आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही सरळ सोप्या भाषेत. आज (दि.२६) रोजी सोनेवाडी चौक केडगाव येथे दक्ष पोलिस मित्र संघटना व डी. आर अग्रवाल कंपनीचे अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी दक्ष पोलिस मित्र संघटनेचे अध्यक्ष शहादेव मुंगसे ,राष्ट्रीय कार्याध्यक्षा शारदा कुलकर्णी ,सचिव पंडित मुंगसे ,रवींद्र भणगे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सोमनाथ वाघमारे, राष्ट्रीय मीडिया प्रमुख शिवा म्हस्के, सरचिटणीस सबिल सय्यद, जिल्हाप्रमुख अन्सार शेख, नगर मीडिया प्रमुख रफिक शेख, नगर तालुकाध्यक्षा आसावरी वायकर, डी.आर अग्रवाल कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर गजानन शेळके , एच आर धर्मेन्द्र कुमार चौधरी , सुभाष कुमार , सचिन ठाकरे सर्व सभासद व पदाधिकारी उपस्थित होते.

