shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बेलापूरातील कालचा स्फोट गॅस गळतीमुळेच ; सर्वानुमते काढलेल्या निष्कर्षाने चर्चांना मिळाला पुर्णविराम..!!

बेलापुर (देविदास देसाई)- बेलापुर येथील श्री.शेलार यांच्या घरात झालेला स्फोट हा गँस गळतीनेच झाला असल्याचा निष्कर्ष बाँम्ब शोधक व नाशक पथकाने काढला असुन गावात चाललेल्या वेगवेगळ्या वावड्यांना त्यामुळे पूर्णविराम मिळाला आहे आणि ग्रामस्थांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला.                    







काल बेलापुर येथील शशिकांत शेलार यांच्या घरी सकाळी ६:३० वाजता मोठा स्फोट झाला होता, त्या स्फोटाने आजुबाजुचा परिसर दणाणून गेला शेलार यांच्या घरातील पत्र्याची छत पुर्णतः उडून गेली, घरात लागलेल्या आगीत घरातील शंशिकात शेलार ज्योती शेलार त्यांचा मुलगा यश व मुलगी नमश्री गंभीर जखमी झाले होते, त्यांना उपचारासाठी प्रथम श्रीरामपूर येथील साखर कामगार  व नतंर लोणी येथील  प्रवरा रुग्णालयात हलविण्यात आले होते,

 घटनास्थळी तात्काळ अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सानप यांनी भेट दिली होती, त्या नंतर ए.टी.एस. पथकानेही भेट देवुन पाहणी केली, नंतर ए.टी.सी. पथकानेही घटना स्थळास भेट दिली व आसपासच्या नागरीकांकडे चर्चा चौकशी केली, तथा बाँम्ब शोधक व नाशक पथकही सायंकाळी ४ वाजता तातडीने आले, या ७ जणांच्या पथकात जंजीरा नामक श्वानही होता,अत्याधुनिक यंत्राच्या मदतीने सर्वत्र स्फोटक पदार्थाचा शोध घेण्यात आला तसेच जंजीरा श्वान यानेही सर्वत्र शोध घेतला परंतु आक्षेपार्ह किंवा संशयास्पद असे काहीच आढळले नाही. त्यामुळे हा स्फोट गँस गळतीमुळेच झाल्याच्या निष्कर्षापर्यंत सर्व जण पोहोचले आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सौ.ज्योती शेलार यांनीही सांगीतले सकाळी गँस पेटविण्यासाठी लायटरचे बटन दाबताच स्फोट झाला होता, त्यामुळे झालेला स्फोट हा गँस गळतीमुळेच झालेला असावा असा अंदाज आहे, रात्री गँस शेगडीचे बटन चालू राहील्यामुळे गँस गळती होत राहीली व सकाळी लायटरचे बटन दाबताच स्फोट झाला असल्याचे सर्वांचे मत झालेले आहे. बेलापुर पोलीस स्टेशनचे पोलिस हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे, गणेश भिंगारदे, निखील तमनर, पोपट भोईटे, हरिष पानसंबळ हे सकाळपासून सायंकाळ पर्यत घटनेच्या ठिकाणी तळ ठोकुन होते,

मात्र गॅस गळतीमुळेच स्फोट झाल्याचे निष्कर्ष काढले गेल्याने अखेर दिवसभर सुरु असलेल्या वेगवेगळ्या चर्चेला पुर्णविराम मिळाला असुन हा स्फोट गँस गळतीमुळेच झाला असल्याचा निष्कर्ष काढण्यात आल्याने नागरीकांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे.

close