shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॉ. विट्टलराव विखे पाटील कृषी महाविद्यालय येथील कृषीकन्या व कृषीदूतांनी राबवला वांबोरी येथे माती परीक्षणाचा उपक्रम..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार  दिनांक १५ डिसेंबर २०२२


डॉ. विट्टलराव विखे पाटील कृषी महाविद्यालय येथील कृषीकन्या व कृषीदूतांनी राबवला वांबोरी येथे माती परीक्षणाचा उपक्रम..!!

वांबोरी : डॉ. विट्टलराव विखे पाटील कृषी महाविद्यालय वीळद घाट येथील कृषीकन्या व कृषीदूतांनी वांबोरी येथे माती परीक्षणाचा उपक्रम राबवला. गावात ग्रामपंचायतीसह ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले या वेळी मा.सरपंच किरण ससाणे,मा. बाबसाहेब भिटे मा. अध्यक्ष जि.प. अध्यक्ष अहमदनगर,मा. किसन जवरे. ग्रामपंचायत सदस्य व आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

          माती परीक्षणसंबंधी जनजागृती व्हावी, व मातीचे आरोग्य राखून आर्थिक बचत व उत्पादन क्षमता कशी वाढवायची यासाठी उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी, रासायनिक खते देण्यापूर्वी किंवा खते दिल्यानंतर ३ महिन्यांनी मातीचा नमुना घ्यावा, माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन करावं, असा सल्ला वीळद घाटातील कृषीकन्यां व कृषिदूतांनी शेतकऱ्यांना दिला.याबरोबरच शेतातील मातीचे नमुने गोळा करून त्याचे परीक्षण करण्यात आले. मातीमध्ये असणारे घटक, जमिनीचा सामू, मातीचा प्रकार याविषयी शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन देण्यात आले. 

         या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. श्री. एम.बी.धोंडे सर, के.एस. दांगडे सर डी. एम नलवडे सर व मृदा विज्ञान विभागाच्या प्रा. पी. सी.ठोंबरे मॅडम यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबवण्यात आला.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close