शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक १५ डिसेंबर २०२२
बुलेट चोरणारे सराईत आरोपी स्थानिक, पल्सर, गुन्हे शाखेकडून जेरबंद..!!
अहमदनगर : पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील संतोष पठारे यांची पल्सर मोटार सायकल चोरीप्रकरणी नगर पोलिसांनी दोघांना अटक केली असून तिसरा आरो...
नगर प्रतिनीधी:-पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील संतोष पठारे यांची पल्सर मोटार सायकल चोरीप्रकरणी नगर पोलिसांनी दोघांना अटक केली असून तिसरा आरोपी पसार झाला आहे. पठारे यांची पल्सर बेलवंडी फाटा येथून ११ जानेवारीला चोरीस गेली होती. याप्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. ही मोटरसायकल चोरी सोमनाथ आव्हाड याने केल्याची माहिती नगर एलसीबीचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. तो पांढरीपुल येथे येणार असल्याची माहिती त्यांना खबर्याने दिली.त्यानंतर त्यांनी स्वतंत्र पथक नेमून पथकाला कारवाईचे आदेश दिले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे, सोपान गोरे , हवालदार सुनील चव्हाण, दत्ता हिंगडे, भाऊसाहेब कुरुंद, संदीप पवार, मनोज गोसावी, संदीप दरंदले, लक्ष्मण खोकले, सागर सासणे यांच्या पथकाने पंढरपूर येथे सापळा लावून सोमनाथ पंढरीनाथ आव्हाड (रा. हर्षवर्धन नगर, तपोवन रोड, अहमदनगर) यास ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर मात्र गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची नावे सांगितली. त्यानंतर पोलिसांनी पाथर्डी तालुक्यातील कडगाव येथील अशोक संजय गीते याला ताब्यात घेतले. तिसरा आरोपी सुधीर कडूबाळ सरकाळे (रा. शहर टाकळी, शेवगाव) हा पसार झाला आहे. ताब्यात घेतलेल्या आव्हाड व गीते यांच्या ताब्यातून दोन पल्सर आणि तीन रॉयल इनफिल्ड बुलेट अशा ४ लाख ८० हजार रुपयांच्या पाच मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

