इंदापूर तालुका कोळी महासंघ यांच्या वतीने चेतन पाटील यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त मोफत शिव भोजन थाळी चे आयोजन.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुका कोळी महासंघ यांच्या वतीने युवा नेते चेतन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शिवभोजन थाळी चे आयोजन करण्यात आले.
इंदापूर बस स्थानक या ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्र असून या ठिकाणी काही रक्कम देऊन गरजू भोजनाचा आस्वाद घेतात याठिकाणी दिनांक २२ जानेवारी रोजी कोळी महासंघ इंदापूर तालुका यांच्या वतीने बहुजन युवा नेतृत्व कोळी महासंघ राष्ट्रीय युवा अध्यक्ष चेतन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शिवभोजन थाळी चे आयोजन करण्यात आले. तसेच कोळी महासंघाच्या माध्यमातून गेली पाच वर्षापासून इंदापूर शहर परिसरात ॲम्बुलन्स सेवा पुरवली जात असल्याची माहिती माजी नगरसेवक प्रशांत शिताप यांनी दिली.
इंदापूर तालूका कोळी महासंघा च्या वतीने मा. नगरसेवक प्रशांत शिताप यांचे संकल्पनेतून गरीब गरजूंना मोफत शिवभोजन थाळी दीली. या मोफत शिव भजन थाळी चे शुभारंभ यावेळी इंदापूर तालूका कोळी महासंघाच्ये जेष्ठ सामाजिक नेते.दत्ताभाऊ कोळी, प्रशांत हजारे,सचिन परबते देवाभाऊ मगर, पैलवान गिरीष एगलांबे, अस्लम शेख न्यानदेव डोंगरे, ऊमेश राऊत, प्रशांत शिताप, दादासाहेब माने इत्यादी ऊपस्थित होते.

