shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वालचंदनगर पाठशाळा क्र ३ येथील गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव.

वालचंदनगर पाठशाळा क्र ३ येथील गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव.

मंथन सामान्य ज्ञान परीक्षा २०२० मध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव
 इंदापूर प्रतिनिधी:मंथन सामान्य ज्ञान परीक्षा २०२० मध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम वालचंदनगर पाठशाळा क्रमांक ३ येथे पार पडला. इयत्ता तिसरी मध्ये ३०० पैकी २८२ गुण मिळवून केंद्रात प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल चिरंजीव श्री रामराजे गणेश निंबाळकर तर ३०० पैकी २७८ गुण मिळवून केंद्रात द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल कुमारी श्रावणी महेशकुमार निंबाळकर हिचा सत्कार करण्यात आला. इयत्ता चौथी मध्ये ३०० पैकी २२२ गुण मिळवून केंद्रात ७ वा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल सफवान निसार बागवान याचा सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाणे महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ बारामती व इंदापूर तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल श्री ढगे सर या सर्वांचे वृक्षाचे रोप देऊन कौतुक करण्यात आले. 

यावेळी शाळा समितीचे सचिव श्री कुंभार सर हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री पाटील सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष पद भूषवले. विद्यालयातील सर्व शिक्षकांनी मुख्याध्यापिका सौ वाघमारे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य केले.
close