shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दुकान टाकण्यासाठी विवाहितेचा छळ : पती व सासू सासऱ्यासह सात जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल..!!



--------------------------------------------------


प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-

दुकान टाकण्यासाठी व गाडी घेण्यासाठी २२ वर्षीय विवाहितेचा तिच्या सासरी छळ केल्या प्रकरणी तिचा पती व सासू-सासऱ्यासह सात जणांच्या विरुद्ध छळवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या बाबतची माहिती अशी की, केज येथील २२ वर्षीय तरुणी शेख झेबा  समीर हिचा विवाह दि. ३ नोव्हेंबर २०१९ रोजी लातूर येथील शेख समीर चाँदपाशा यांच्या सोबत झाला होता. तिला लग्ना नंतर चार महिने चांगले नांदविले. दरम्यान तिला त्याच्या पासून एक मुलगा झाला आहे. नंतर तिला तिचा नवरा शेख समीर याने दुकान टाकण्यासाठी व चार चाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रु. घेऊन ये. म्हणून मागणी केली. तिने हे तिच्या वडिलांना सांगितले नाही. त्या नंतर तिला तिची सासू-सासरे इलियास व चाँदपाशा शेख यांनी तिला मारहाण केली. तसेच तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या प्रकरणी विवाहीता झेबा समीर शेख हिच्या फिर्यादी वरून तिचा नवरा समीर शेख, सासू इलियास शेख, सासरा चाँदपाशा शेख, दोन दीर व जाऊ आणि मावस सासू या सात जणांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७/२०२२ भा.दं.वि. ४९८(अ), ३२३,५०४, ५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मंगेश भोले हे पुढील तपास करीत आहेत.

close