पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी प्रा. दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी सुनील चांदोरे यांची बिनविरोध निवड.
इंदापूर प्रतिनिधी: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालकांची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली असून यामध्ये काही संचालक बिनविरोध निवडून आले तर काही प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेतून निवडले गेले. आज दिनांक १५ जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बँकेचे संचालक अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये बँकेच्या अध्यक्षपदी प्रा. दिगंबर दुर्गाडे यांची अध्यक्षपदी निवड तर उपाध्यक्षपदी सुनील चांदोरे यांची निवड निवडणूक निर्णय अधिकारी सोबले यांनी केली.
यावेळी बँकेचे संचालक तथा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, तसेच बँकेचे संचालक तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, रमेश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यासह सर्व नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते.
उपस्थित सर्व संचालक यांच्यावतीने अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे सत्कार करून अभिनंदन करण्यात आले

