दोन तीन वर्षांपासून इथेनॉल हा साखर उद्योगांसाठी प्रमुख व्यवसाय झाला - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील.
ग्रामीण भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा फायदा केंद्र सरकारच्या धोरणाने केले - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
सर्व उसाचे गाळप होईपर्यंत कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना सुरू राहील - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील.
इंदापूर प्रतिनिधी:कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आत्तापर्यंत ५ लाख ३५ हजार टन उसाचे गाळप झाले असून परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी तसेच सर्व सभासद यांनी काळजी करण्याचे कारण नाही .सर्व उसाचे गाळप होईपर्यंत कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना सुरू राहील असे मत यावेळी माजी मंत्री व कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या
वतीने ८१ लाख लिटर इथेनॉल पुरवठ्याची निविदा ऑइल कंपन्यांकडे दाखल करण्यात आली आहे.त्यापैकी जवळपास ४८ लाख लिटर इथेनॉल पुरवठा करण्याची परवानगी कारखान्यास मिळाली असून पहिले दोन टँकर शनिवारी (दि.१५) रवाना झाले यावेळी माजी मंत्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की कै. शंकरराव (भाऊ) पाटील यांनी हा कारखान्याचा प्रकल्प सुरू करताना दूरदृष्टीपुढे ठेवून इथेनॉलची तरतूद केली होती.त्यावेळी याबाबत कोणतेही धोरण नव्हते, शाश्वती नव्हती तसेच खरेदी होत नव्हती परंतु मागील दोन तीन वर्षांपासून इथेनॉल हा साखर उद्योगांसाठी प्रमुख व्यवसाय झालेला आहे.
ग्रामीण भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा फायदा करण्याचं धोरण केंद्र सरकारने केल्याने हर्षवर्धन पाटील यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचे आभार व्यक्त केले.
प्रारंभी कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व उपाध्यक्ष भरत शहा तसेच संचालक मंडळाच्या हस्ते इथेनॉल टँकरचे पूजन करून चालकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी हनुमंत जाधव, शांतीलाल शिंदे, रवींद्र सरडे, छगन भोंगळे, प्रदीप पाटील, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, पराग जाधव, विश्वास देवकाते, निवृत्ती गायकवाड, भूषण काळे, प्रवीण देवकर, रतन देवकर, केशव दुर्गे, सतीश व्यवहारे, हिरा पारेकर, वसंत मोहोळकर, शारदा पवार, कांचन कदम, कार्यकारी संचालक देवराव लोकरे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

