shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ऊसतोड कष्टकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करूयात.... जयश्रीताई खबाले.

ऊसतोड कष्टकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करूयात.... जयश्रीताई खबाले.
इंदापूर प्रतिनिधी: मकरसंक्रांतीचा सण  महिलांसाठी मोठ्या आनंदाचा दिवस असतो. या दिवशी सर्व जण एकमेकांना तिळगूळ देऊन आनंद साजरा करतात. परंतु काही व्यक्ती अशाही असतात की त्या इतरांसाठी आनंद निर्माण करतात.असेच कार्य शहा गावच्या विद्यमान ग्रा.पं. सदस्या व इंदापूर तालुका महिला दक्षता कमिटीच्या सदस्या जयश्रीताई खबाले यांनी केले आहे. त्यांनी आपली मकर संक्रांत ऊसतोड मजुरांसोबत साजरी करून कामगारांच्या जीवनात आनंद निर्माण केला. महिला कामगारांना सुवासिनीचं लेणं चुडा  बांगड्या,साडी, तिळगुळ,  सौंदर्य उपयोगी साहित्य देऊन त्यांनी संक्रांतीचा सण साजरा केला.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सायराभाभी आत्तार, रेडा गावच्या    ग्रामपंचायत  सदस्या राजश्री पवार यांनी देखील कामगारांना खाऊ वाटप केले.
दुर्लक्षित असणाऱ्या ऊसतोड कामगारांना मकर संक्रांतीची ही अनोखी भेट मिळाल्यामुळे त्यांनी जयश्रीताई खबाले यांचे आभार मानून त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी जयश्रीताई खबाले, सायरभाभी आत्तार,राजश्री पवार, सारिका खबाले, हनुमंत गलांडे, कामगार, महिला,मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close