पूर्णा । प्रतिनिधी , दि.२१... स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रा प सदस्य व सरपंच यांचे काम महत्त्वाचे असून हे काम करत असताना अंतर्गत वादातून चक्क
एका सरपंचाने ग्रामपंचायत सदस्याला मारहाण केल्याची घटना दिनांक १७ जानेवारी रोजी तालुक्यातील कानडखेडा येथे घडली होती अखेर चार दिवसानंतर पूर्णा पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीवरून त्या सरपंचाला पूर्णा पोलिसांनी अटक केली आहे.
अधिक माहिती अशी की पूर्णा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या मौजे कानडखेड येथे गावातील गायरान असलेल्या बौद्ध वसाहतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी नियोजित जागा आहे. सदर जागेबाबत सरपंच तुकाराम सालपे व ग्रामपंचायत सदस्य अशोक वाघमारे यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता परंतु सोमवार दिनांक 17 जानेवारी रोजी या जागेसंदर्भात पंचायत समितीचे एक पथक चौकशीसाठी कानखेड येथे आले होते. हे पथक गावातून निघून गेल्यानंतर गावातील सरपंच तुकाराम सालपे व त्याचा भाऊ सुजन सालपे यांनी ग्रापं सदस्य अशोक वाघमारे यांना बौद्ध विहार जवळ गाठून मी गावचा सरपंच आहे,
सदरील जागा ही आमची आहे असे म्हणून दोघा भावांनी जातीवाचक शिवीगाळ करून एक आणि पाठीत छातीवर गालावर मार दिला हे पाहून गावातील काही जण घटनास्थळाकडे धावले असता, तुम्ही आमच्या भांडणांमध्ये येऊ नका असे म्हणून या दोघा भावांनी नागरिकांनाही धमकावले व जातिवाचक शिवीगाळ करून जिवानिशी मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तब्बल चार दिवसानंतर ग्रामपंचायत सदस्य अशोक भगवान वाघमारे यांनी यासंदर्भात पूर्णा पोलीस स्टेशनला झालेल्या घटनेची माहिती देऊन सरपंचांच्या विरोधात तक्रार दिली.
त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सरपंच तुकाराम सखाराम सालपे, त्याचा भाऊ सुजाण सखाराम सालपे या दोघांविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अँट्रासिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास गंगाखेड येथील उपविभागीय पोलिस अधिकारी शिरतोडे हे करीत आहेत.
दरम्यान दोन्ही सालपे बंधूना गुरुवारी रात्री कानखेड येथे अटक करण्यात आली असून शुक्रवार दिनांक 21 जानेवारी रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश मुळे यांनी परभणी येथील न्यायालयासमोर हजर केले.

