shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सोमवारपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु होणार- जिल्हाधिकारी यांनी दिली परवानगी..!

उपाययोजना व्हावेत काढले आदेश..!
पूर्णा । सय्यद कलीम :-
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग दि. २४ जानेवारीपासून सुरु करण्यास जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी परवानगी बहाल केली आहे.

जिल्ह्यातील सर्व प्राचार्य व मुख्याध्यापक यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी या कार्यालयाने शुक्रवारी (दि.२१) एक पत्र पाठवून दि.२४ जानेवारीपासून शासन परिपत्रकानुसार इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरळीत सुरु करावेत, असे स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकार्यांच्या आदेशाप्रमाणे कोविड बाबत व लसीकरणाबाबत मार्गदर्शक सूचनांचे संबंधित शैक्षणिक संस्था, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी पालन करावे, असेही नमूद केले आहे. विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, या दृष्टीकोणातून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शाळेत नियमित उपस्थित राहून कामकाज करावे, असेही शिक्षणाधिकार्यांनी म्हटले आहे. 

कोविड संदर्भात लक्षणे किंवा ताप, खोकला असणार्या विद्यार्थ्यांना पालकांनीच शाळेत पाठवू नये, असेही शिक्षणाधिकार्यांनी म्हटले.
close