पूर्णा । सय्यद कलीम :-
राज्य परिवहन विभागाच्या परभणी आगारातील संपकरी कर्मचार्यांविरोधात राज्य सरकारने दिलेल्या सूचनांप्रमाणे अधिकार्यांनी कारवाईचे सत्र सुरुच ठेवले आहे.
परभणी विभागातील एकूण १४ कर्मचार्यांची प्रशासकीय बदली करण्यात आली. तर १३ कर्मचार्यांची सेवा समाप्त करण्यात आली. ३९३ कर्मचार्यांचे निलंबन करण्यात आले. ४०२ कर्मचार्यांची समक्ष चौकशी सुरु करण्यात आली. तर २२९ कर्मचार्यांना कारणमिमांसा नोटीसा बजावण्यात आल्या. २१६ कर्मचार्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. बडतर्फ केलेल्या कर्मचार्यांत ९३ चालक व ९१ वाहक व यांत्रिकी विभागातील २४ आणि प्रशासकीय विभागातील ८ कर्मचार्यांचा समावेश आहे.

