पूर्णा । कलीम सय्यद :-
राज्य परिवहन विभागाच्या संपावरील कर्मचार्यांबरोबर सर्व स्तरावर तडजोडीबाबत बैठकांचे सत्र आटोपल्यानंतर महामंडळाने कारवाईचे सत्र सुरु केले असतांना एसटीच्या परभणी विभागात हळूहळू का होईना १४२ आंदोलनकर्ते कर्मचारी कामावर परतले आहेत.
परभणी विभागातील एकूण ६ आगारात ३६ चालक, ६४ वाहक, ६ चालक तथा वाहक, यांत्रिकी विभागातील ३३ व प्रशासकीय विभागातील ३ असे एकूण १४२ कर्मचारी कामावर हजर आहेत, अशी माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.
दरम्यान, परभणी विभागातील परभणी, वसमत, पाथरी, गंगाखेड, जिंतूर, कळमनुरी या आगारातून काही बसेसच्या फेर्या सुरु झाल्या आहेत. त्यात शुक्रवारी १५६ फेर्या झाल्या. त्यातून ४ हजार ८२६ प्रवाशांनी प्रवास केला.
आंदोलनकर्त्या कर्मचार्यांनी हळूहळू का होईना कामावर परतण्यास सुरुवात केल्यानंतर सर्वच आगारातील बसेस हळूहळू आपआपल्या मार्गांवर धावू लागल्या आहेत.

