shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेच्या कार्य अहवालाचे प्रकाशन यशवंत मानखेडकर यांच्या हस्ते संपन्न.

जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेच्या कार्य अहवालाचे प्रकाशन  यशवंत मानखेडकर यांच्या हस्ते संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी:दि २ जानेवारी२०२२ रोजी पुण्यामध्ये 'जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेच्या कार्य अहवालाचे प्रकाशन.श्री यशवंत मानखेडकर सर, जिल्हा समन्वयक 'नेहरू युवा केंद्र पुणे तथा उपसंचालक मुंबई महाराष्ट्र राज्य, यांच्या हस्ते संपन्न झाले, 
यावेळी 'जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक/ अध्यक्ष तानाजी मारकड यांनी प्रकाशन सोहळ्यानंतर मानखेडकर सर यांची मुंबई उपसंचालक पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार केला.

या कार्यक्रम प्रसंगी अँड सोनवणे, 'जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे विश्वस्त अविनाश मोहिते, स्वप्नील शिंदे, आम्रपाली मॅडम, नेहरू युवा केंद्राचे तालुका समन्वयक विकास कणसे, संदीप बारवकर, व उपस्थित मान्यंवर, पुणे जिल्ह्यातील सर्व तालुका समन्वयक संस्थांचे प्रतिनिधी अध्यक्ष उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील शिंदे सर यांनी केले

 यावेळी 'जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल मानखेडकर सर यांनी गौरवोद्गार काढून, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना संविधान देवून सन्मानित केले,
close