shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वालचंदनगर येथे युवराजसिंग राजपूत या मुलाचा प्रामाणिकपणा.स्वामी समर्थांच्या पालखीतील भक्ताचा महागडा मोबाईल सापडलेला शोध घेत केला परत.

वालचंदनगर येथे   युवराजसिंग राजपूत या मुलाचा प्रामाणिकपणा.

स्वामी समर्थांच्या पालखीतील भक्ताचा महागडा मोबाईल  सापडलेला शोध घेत केला परत.
वालचंदनगर ( ता.इंदापुर ) येथील भारत चिल्ड्रन्स अॕकाडमीच्या इंग्रजी माध्यमच्या शाळेत युवराजसिंह राजपूत या विद्यार्थ्याचा सन्मान करताना शाळाचे प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर, व पोलीस अधिकारी उपस्थित असताना.

           वालचंदनगर येथील सौ. ललिता मंगल कार्यालयामध्ये स्वामी समर्थांच्या पालखी सोहळ्यात एका स्वामी भक्ताचा महागडा मोबाईल हरवला आणी तो पत्रकार आमोल राजपूत यांचे चिरंजीव  युवराजसिंग राजपूत यास सापडला .त्याने प्रामाणिकपणा दाखवत संबंधीत मुळ मालकाचा शोध घेत हा महागडा मोबाईल परत दिल्याने भारत चिल्ड्रण अॕकाडमीच्यावतीने सत्कार करण्यात आल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर यांनी दिली.

               दर वर्षी प्रमाणे यंदाही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका असलेला पालखी सोहळा वालचंदनगरहुन बारामती मार्गे  मार्गस्थ होतो.त्याप्रमाणे हा सोहळा वालचंदनगर येथे नुकतेच  होता.हा सोहळा सौ.ललिताबाई लालचंद  मंगल कार्यालयात विसवल्यानंतर स्वामींच्या आरतीवेळी वालचंदनगर परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात. आरतीच्या वेळी एका स्वामी भक्त यांचा  मोबाईल गहाळ झाला.दरम्यान या कार्यक्रमासाठी पत्रकार अमोल राजपूत , युवराजसिंहसह कुटुंब उपस्थित होते. दरम्यान पत्रकार अमोल  राजपूत  यांचे चिरंजीव भारत चिल्ड्रन्स अॕकाडमीमध्ये इ.५ वी मध्ये शिक्षण घेणारे युवराजसिंग राजपूत यांना दरम्यानच्या काळात बेवारसपणे मोबाईल पडल्याचे लक्षात आले तो मोबाईल वडिलांकडे दिला.या सापडलेल्या मोबाईलची आजुबाजुला पालखी सोहळ्यातील भाविकांकडे मोबाईल कोणाचा आहे का ? चौकशी केली. तरीही मोबाईल मालकाचा शोध होईना अखेर वालचंदनगर स्वामी समर्थ सेवा मंडळ अध्यक्ष रमेश देशपांडे यांच्या माध्यमातून कार्यक्रमातील स्पिकर वरुन मोबाईल हरवला आहे का ? असे अवाहन केल्यानंतर संबंधीताला ओळख पटवुन मोबाईल परत केला. दरम्यान भारत चिल्ड्रन्स अॕकाडमीचे प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर व पोलीस कर्मचारी रतिलाल चौधर यांनी या विदयार्थ्याचा  सत्कार केला.


close