मोर्शी तालुका प्रतिनिधी :-
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने हुतात्मा दिनाचे औचित्य साधून 8 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अमरावतीशी संलग्नित असलेल्या स्थानिक शिवाजी उच्च माध्यमिक शाळेच्या सार्जंट पार्थ धुळे याच्या नेतृत्वात एनसीसी कॅडेट्स यांनी मोर्शी येथील जयस्तंभ येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याचे पूजन,हरार्पण केले व ठीक अकरा वाजता दोन मिनिटे मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
याप्रसंगी शिवाजी बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष संजय उल्हे,एनसीसी ऑफिसर श्रीकांत देशमुख,जेष्ठ शिक्षिका विजया रोकडे,यादवराव आगरकर,कार्पोरेल ओम इंगळे,मंदार राऊत,प्रथमेश कटोलकर,रमण शेरेकर,अनिष्का गवई उपस्थित होते.
यावेळी राजकीय,सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक गणमान्य मंडळींनी बापूंना श्रद्धांजली अर्पण केली.

