shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय करून आपल्या जीवनाचे राहणीमान उंचावण्याचा प्रयत्न करावा - युवा उद्योजक अमोलराजे इंगळे.

युवकांनी  नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय करून आपल्या जीवनाचे राहणीमान उंचावण्याचा प्रयत्न करावा - युवा उद्योजक अमोलराजे इंगळे.

हॉटेल जगदंबा मच्छी खानावळ चे उद्घाटन इंदापूर तालुक्यातील युवा उद्योजक अमोलराजे इंगळे यांच्या शुभहस्ते व गणेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न 

इंदापूर प्रतिनिधी: दिनांक ३० जानेवारी २०२२ रोजी
हॉटेल जगदंबा मच्छी खानावळ चे उद्घाटन इंदापूर तालुक्यातील युवा उद्योजक अमोलराजे इंगळे यांच्या शुभहस्ते व गणेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाला.
यावेळी अमोलराजे इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, करमाळा येथील वीट गावचे अतिशय सुंदर आणि सुगरण असा स्वयंपाक बनवणारे सोमनाथ रामचंद्र जराड हे हॉटेल व्यवसायातील एक एक अग्रगण्य असे व्यक्तिमत्व असून त्यांच्या नोकरीपेक्षा व्यवसाय चांगला या उद्देशातून ते अतिशय चांगल्या पद्धतीने या हॉटेल व्यवसायामध्ये सेवा देत असताना आज त्यांनी इंदापूर बायपास पुणे सोलापूर हायवे लगत हॉटेल जगदंबा मच्छी खानावळ याची उभारणी करून त्याचा उद्घाटन समारंभ आयोजित केला आणि आपल्या परिसरामध्ये अस्सल मच्छी खानावळ  उपलब्ध करून येथील खवय्यांची परवणी करण्याचा त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्याबद्दल त्याचे विशेष अभिनंदन करून धन्यवाद देतो. 
सोमनाथ जराड सारखा कर्तुत्ववान युवकांनी आज नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय करून आपल्या जीवनाचे राहणीमान उंचावण्याचा प्रयत्न करून नवीन युवकांना त्यांच्या या कृतीतून प्रेरणा देणारे ठरणारे आहेत. म्हणूनच तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उत्तम व्यवसाय करावा आणि आपले जीवनमान उंचवावे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी युवा उद्योजक गणेश पाटील भिमानगर, गारवा हॉटेल चे संकेत वाघमोडे, सोनू ढावरे, नारायण असबे, बापू गलांडे, ओमकार गाडे, तुकाराम खाडे, मिलिंद पोलके नेचर डेअरी एमडी, प्रवीण शेलार, गुरुनाथ जामदार, अण्णा जामदार, प्रमोद जाधव ,शिवाजी जाधव, सतीश जाधव, शुभम जामदार, मंगेश गोपालकर इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते

सदर उद्घाटनानंतर सोमनाथ जराड यांचा सत्कार युवा उद्योजक अमोलराजे इंगळे यांनी अभिनंदन  करून शुभेच्छा दिल्या.
close