shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पंतप्रधान मोदी संदर्भातील वक्तव्याबद्दल नाना पटोलेंनी माफी मागावी - हर्षवर्धन पाटील

पंतप्रधान मोदी संदर्भातील वक्तव्याबद्दल नाना पटोलेंनी माफी मागावी - हर्षवर्धन पाटील
इंदापूर : प्रतिनिधी (दि. १८ जानेवारी २०२२)
          देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे संदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. या वक्तव्याबद्दल नाना पटोले यांनी तात्काळ माफी मागावी, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे मंगळवारी (दि.१८) केली.
             भंडारा जिल्ह्यात एका सभेत बोलताना नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. देशाच्या लोकशाहीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेले पंतप्रधान हे पद आदरणीय व सर्वोच्च असे पद आहे. या पदाचा मान राखणे प्रत्येक राजकीय पक्ष, व्यक्ती यांची नैतिक जबाबदारी असते. त्यामुळे नाना पटोले यांनी केलेले वक्तव्य हे अतिशय आक्षेपार्ह असून त्यांनी तात्काळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीरपणे माफी मागावी, अन्यथा भारतीय जनता पार्टी तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी बोलताना भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे. देशातील सर्वोच्च पदांवरील व्यक्ती बद्दल बोलताना राजकीय नेत्यांनी त्या पदावरील व्यक्तींचा मान-सन्मान राखला पाहिजे, याविषयी सर्व पक्षप्रमुखांनी नोंद घेणे गरजेचे आहे, असे मतही माजी संसदीय कार्य मंत्री असलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
__________________________

close