शासनाच्या सामाजिक न्याय विभाग अंतर्गत राजगुरुनगर येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात २०२१ - २०२२ साठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, वि.जा.भ.ज., इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ, अपंग आदी प्रवर्गाच्या विद्यार्थिनींना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहेत.
प्रवेशासाठी विद्यार्थिनी बाहेरगावचे परंतु राजगुरुनगर मध्ये शिक्षण घेणारी असावी मागील वर्षी उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रिका, सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचे जातीचे प्रमाणपत्र, तहसीलदारांच्या स्वाक्षरीचे वडीलांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, महाराष्ट्र निवासाचे प्रमाणपत्र, तसेच महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, मुलीचे आणि वडिलांचे आधार कार्ड, शिधापत्रिकेची सत्य प्रत, अर्जासोबत जोडावी कोविड १९ आजाराबाबत वडिलांचे व विद्यार्थिनी चे लेखी संमतीपत्र असावे शाळा अथवा महाविद्यालय प्रत्यक्ष सुरू असल्याबाबत मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांचे लेखी हमीपत्र देखील अर्जा सोबत असणे आवश्यक आहे.
शासकीय वसतिगृहात विनामूल्य निवास व भोजनाची सुविधा आहे शासनाने ठरवून दिलेल्या दराने पुस्तके, शैक्षणिक साहित्य , निर्वाहभत्ता आदीसाठी रक्कम आधार क्रमांक जोडलेल्या विद्यार्थ्याच्या बचत खात्यावर जमा होते कोविड १९ महामारी मुळे रिक्त जागेच्या ५० टक्के जागा भरल्या जाणार आहेत. बाहेर गावाकडील परंतु राजगुरुनगर परिसरात शिक्षण घेणाऱ्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी वसतिगृहात येऊन नोंदणी करावी. असे आवाहन गृहपाल ए.आर.रणदिवे यांनी केले आहे.

