shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विजयपुर सोसायटीच्या चेअरमनपदी अशोक कासोदे तर व्हा.चेअरमन पदी दत्तात्रय घाटविसावे यांची बिनविरोध निवड...!

एरंडगाव:-शेवगांव तालुक्यातील राजकीय दृष्या महत्वपुर्ण समजल्या जाणा-या विजयपूर वि.का.सेवा.सह.सोसायटीच्या संचालक मंडळाची चेअरमन व व्हाचेअरमन पदाची निवडणुक नुकतीच बिनविरोध पार पडली. संस्थेच्या चेअरमनपदी अशोक कासोदे यांची तर व्हाचेअरमन पदावर  दत्तात्रय घाटविसावे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित चेअरमन व्हा.चेअमन यांचा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेवगांव तालुका विकासाधिकारी कार्यालयात  तालुका विकासाधिकारी भाऊसाहेब चेके, बँक निरीक्षक कुंडलिकराव भापसे. निरीक्षक अनिल भुसारी, कार्यालयीन अधीक्षक विष्णू कोठूळे, वसुली अधिकारी कल्याणराव आढाव, यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. 

     
यावेळी विजयपूरचे माजी सरपंच काकासाहेब काळे, लक्ष्मणराव गायकवाड, सचिव विठ्ठलराव आर्ले, सहसचिव अमोल हाडके इ उपस्थित होते. नवनिर्वाचित संचालक मंडळ आणि अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे  लोकनेते मारुतरावजी घुले पाटील  ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे अध्यक्ष मा. आमदार डॉ नरेंद्र घुले , अहमदनगर जिल्हा म. सह. बँकेचे संचालक मा. आमदार चंद्रशेखर घुले ,शेवगांव पंचायत समिती सभापती मा.डॉ.क्षितीज  घुले पा. ज्येष्ठ संचालक काकासाहेब नरवडे यांनी अभिनंदन केले आहे. 

close