shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूरात सुविधायुक्त कोविड सेंटर तयार ठेवावे- हर्षवर्धन पाटील

इंदापूरात सुविधायुक्त कोविड सेंटर तयार ठेवावे- हर्षवर्धन पाटील.
इंदापूर: प्रतिनिधी दि.18/1/22
   इंदापूर तालुक्यात सध्या कोरोनाची  रुग्णसंख्या दररोज वाढताना दिसत आहे. सध्याच्या ॲमेक्रॉनचा प्रादुर्भाव अतिशय झपाट्याने देशात वाढत आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातही सर्व सुविधायुक्त कोविड सेंटर आरोग्य विभागाने तयार ठेवावे, असे मत भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे मंगळवारी ( दि.18) पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.
         हर्षवर्धन पाटील म्हणाले,'सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे, पूर्वी कोरोनामुळे राज्यात मृत्यूची संख्या 1 एवढी होती, ती संख्या आता 30 पर्यंत पोहचली आहे. त्यामुळे जनतेने काळजी घेणे गरजेचे आहे. जनतेने शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. मास्कचा वापर करावा. सध्या दोन्ही डोस घेतल्याने हानीचे प्रमाण कमी आहे, ही दिलासा देणारी बाब आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. तसेच नागरिकांनी कोरोना सदृश्य लक्षणे दिसताच तात्काळ तपासणी करून घ्यावी, तात्काळ तपासणी करून घेणे फायदेशीर ठरते, असे त्यांनी सांगितले.
        सध्या तालुक्यामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस न घेतलेल्या अनेक व्यक्ती असून लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर देणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशात कोरोना लसीचा पुरेसा साठा ठेवलेला आहे. परिणामी, कोठेही लसीची टंचाई नाही. त्यामुळे लस न घेतलेल्या नागरिकांनी तात्काळ लस घ्यावी, असे आवाहनही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केले.
____________________________
फोटो :- हर्षवर्धन पाटील.
close