शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
सोमवार दिनांक १७ डिसेंबर २०२२
संगमनेर तालुक्यात आढळला राहुरीतील व्यक्तीचा मृतदेह..!!
संगमनेर : तालुक्यातील निमगावजाळी शिवारात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून तो राहुरी तालुक्यातील रामपूर येथील असल्याचे आश्वी पोलिसांनी सांगितले.
याबाबत आश्वी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कोल्हार घोटी राज्यमार्गावरील निमगावजाळी शिवारातील श्रीरंग वदक याच्या गट नंबर १०/३८ मधील हरभरा पिकात ४० ते ४५ वय असलेला एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. याबाबतची माहिती कामगार पोलिस पाटील दिलीप डेंगळे यांनी आश्वी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुभाष भोये आणि हवालदार आर. बी. भाग्यवान, दैमिवाळ, पोलिस पाटील डेंगळे, तसेच साहेबराव खरात, बाळासाहेब कोल्हे. मनोज आरगडे, बाबासाहेब डेंगळे आदी स्थानिकाच्या मदतीने मृतदेह पुढील कारवाईसाठी संगमनेरच्या घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला होता.यावेळी डॉक्टरांनी मृतदेहाची तपासणी केली असता त्या व्यक्तीचा मृत्यू हा हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे सांगितले. दरम्यान, पोलिसांनी मयत व्यक्तीचा शोध घेतला असता, मयत व्यक्ती ही राहुरी तालुक्यातील रामपूरचा असून तिचे नाव राजेंद्र बबन आवटी (वय ४६) असल्याचे पोलिसांना समजले. त्यामुळे पोलिसांनी उत्तरणीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

