आहार आणि आचरण यांचा परस्पर संबंध समजून घेणे हे निरोगी आरोग्यासाठी, सुदृढतेसाठी अत्यावश्यक आहे.तथापि तपसाधना आणि नि:स्वार्थी जिवनमूल्यांवर आधारित अशा आपल्या आचरण पद्धतीचे व्यापारीकरण होत आहे, यासाठी पुढील बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे.
आंबट आणि खारट पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरामध्ये पित्त वाढते. तसे सदैव क्रोध, मत्सर, राग, आडमुठेपणा, यांचा अंगीकार केल्यामुळे शरीरात पित्त वाढते.रूक्ष, कोरडा, शिळा, सत्वहीन आहार घेतल्यामुळे शरीरामध्ये वात निर्मिती होते. तसे सदैव चिंता, हट्ट, काळजी, धांदरटपणा यामुळे वात निर्मिती होते.अति गोड पदार्थ खाल्ल्यामुळे कफ वाढतो. तसे केवळ झोपा काढणे, मूर्खासारखे वागणे, पडून राहणे, रिकामटेकडा वेळ घालवणे,सुस्तीत दिवस काढणे यामुळे कफ वाढतो.
तेव्हा हे लक्षात घ्यायला हवे की, आहार आणि आचरण हे सुदृढ आरोग्याचे आधारस्तंभ आहेत.
आरोग्यरक्षणासाठी वात, कफ, पित्त यांचे संतुलन हेच महत्त्वाचे असते.आरोग्यरक्षणात शिस्त महत्त्वाची आहे. नियमितपणा हवा. अनियमितपणा सदैव टाळायला हवा. ज्यांची सर्व कर्मे, व्यवहार अनियमित असतात त्यांच्या शरीरातील सर्वच अवयवांना या अनियमिततेचा अतोनात त्रास होतो. अनियमितपणे वागून, विकार-वासनांच्या आहारी जाऊन आपण शरीरावर अत्याचारच करीत असतो. शरीरातील अनियमितता यालाच रोग असे म्हटले आहे.
तेव्हा राष्ट्रीय आरोग्य हे राष्ट्रीय पर्यावरणाचा एक अविभाज्य घटक आहे हे समजून याबद्दल साक्षरता होणे गरजेचे आहे. आपण या गोष्टीचा प्रचार करावा व कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या पर्यावरण, आरोग्य जनजागरण मोहिमेमध्ये सहभागी व्हावे.
लेखक :
पुण्यरत्न डॉ. चंद्रकांत शहासने, देशभक्तकोशकार पुणे.
मोबाईल नंबर :९८८१३७३५८५
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या पर्यावरण- आरोग्य साक्षरता मोहिमेंतर्गत प्रसारीत.

