प्रतिनिधी : बाबासाहेब तिपुळे
टाकळी काझी : ९ / नगर तालुक्यातील टाकळी काझी येथील नगर जामखेङ रोङवर शनिवार दि . ८ रोजी सायंकाळी सहा वाजता टँकरचा अपघात झाला . टँकर रोङवरील बाजूच्या काटेरी बाभळीला धङकला . या घटनेत कुठल्याही प्रकारची जिवित हानी झाली नाही परंतु टँकरचे मोठे नुकसान झाले आहे .
यावेळी नागरिकांची अपघात स्थळी गर्दी झाली होती . साधारण सहा महिन्यापूर्वी या रोङचे काम झाले असुन रोङवर कुठल्याही प्रकारचे स्पिड ब्रेकर नसुन परिणामी वारंवार अपघात होतात त्यामुळे काहींना आपला जीवही गमवावा लागतो .तरी सदर रस्त्यावर योग्य ठिकाणी स्पीड ब्रेकर बनवावेत जेणेकरून अपघात होणार नाहीत असे नागरिकांचे म्हणणे आहे .

