shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चांदणी चौकात पोलिसाला मारहाण आठ जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ११ डिसेंबर २०२२

  
चांदणी चौकात पोलिसाला मारहाण आठ जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल..!!
अहमदनगर : दुचाकीची धडक लागल्याच्या कारणातून पोलिस कर्मचार्‍याला मारहाण करत त्यांच्याकडील 20 हजार रूपयांची रक्कम व 10 हजार रू. किंमतीचा मोबाईल काढून घेतला. चांदणी चौकातील महालक्ष्मी मंदिराच्या समोर ही घटना घडली. मुख्यालयात नेमणूक असलेले अदिनाथ दिनकर शिरसाठ (रा. आष्टी जि. बीड) असे लुटमार झालेल्या पोलिस कर्मचार्‍यांचे नाव आहे. त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून श्याम बाबासाहेब जाधव, रोहन राजु जाधव (दोघे रा. निंबोडी ता. नगर) व अनोळखी सहा जणांविरूध्द कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजि.नं. 26/2022 दरोड्याचा (395) दाखल करण्यात आला आहे.पोलिस कर्मचारी शिरसाठ हे त्यांच्या दुचाकीवर चांदणी चौकातून जात असताना महालक्ष्मी मंदिराच्या समोर दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणातून त्यांचा व जाधव यांचा वाद झाला. या वादात आठ जणांनी पोलिस कर्मचारी शिरसाठ यांना मारहाण केली. त्यांच्याकडील 20 हजार रूपये व मोबाईल काढून घेतला असल्याचे फिर्यादीत पोलीस कर्मचारी शिरसाठ यांनी म्हटले आहे.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close