नायगांव । प्रतिनिधी:-
येथील नायगांव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंचपदासाठी नुकतीच निवडणूक झाली, त्यात नायगांव येथील ग्रामपंचायत सदस्य सौ.मिनाताई चंद्रसेन लांडे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
उपसरपंचपदासाठी त्यांचा एकमेव अर्ज होता म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक व तलाठी यांनी काम पाहिले सौ.लांडे यांनी आपल्या एक वर्षच्या कार्यकाळात गावात रस्ता,दलित वस्तीची नळ व पाणी योजना,जोड रस्ता, वृक्षारोपन अशी विविध विकासकामांना मोठी चालना देऊन पुर्ण केली आहे.
त्यांच्या योग्य सुकार्यांची दखल घेऊन नायगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याने त्यांचे नायगांव सह सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

