प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
इंदापूर: दि. ३१/ इंदापूर तालुक्यातील कालठण नंबर 1 येथील ग्रामपंचायतीमध्ये मनमानी कारभार होत आहे . सरपंच सोनाली जाधव यांचे नातेवाईक ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करतात, ग्रामसेवक हनुमंत पाटील वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवतात.
कालठण येथील श्री .बापू मच्छिंद्र पाडुळे यांनी पंचायत समिती इंदापूर येथे कागदपत्रे सादर करून त्यांच्या भूखंडावरची नोंद नियमबाह्य असल्याचे गटविकास अधिकारी यांना दाखवून दिले. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी नियमबाह्य नोंद रद्द करून खरी नोंद नियमित करण्यासाठी आदेश दिले. परंतु सरपंचांच्या नातेवाईकांचा हस्तक्षेप व दबाव असल्यामुळे आणि ग्रामसेवक हनुमंत पाटील आर्थिक हितसंबंध जोपासत असल्यामुळे,अद्याप पर्यंत आदेशाची अंमलबजावणी नाही. भूखंड बळकावणार्यांचे हितसंबंध असल्यामुळे दिरंगाई केली जात आहे. याबाबत श्री.पाडुळे यांनी विनंती करून देखील ग्रामसेवक हनुमंत पाटील यांनी "सरपंच व सदस्यांनी सांगितल्याशिवाय मी नोंद रद्द करू शकत नाही असे सांगितले.
ग्रामसेवक यांना हर्षल पाडुळे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व सेवा नियम 1960 तुम्हाला माहित आहे काय असे विचारले असता ग्रामसेवक यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. यावरून ग्रामसेवक हनुमंत पाटील निष्क्रिय असून नागरिकांना त्रास देण्यासाठी व पैसे खाण्यासाठी ग्रामसेवक आहेत काय अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे ग्रामसेवकाना साधा कर व सेवा नियम माहीत नाही त्यामुळे त्यांना पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही अशी भावना श्री.पाडुळे यांनी व्यक्त केली. सरपंच सोनाली जाधव या अकार्यक्षम असल्यामुळे त्यांना देखील पदावर राहण्याचा अधिकार नाही. लवकरच याबाबत जिल्हा परिषद वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे व ग्रामसेवक यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांच्या सेवा पुस्तिकेमध्ये याची नोंद घेण्यासाठी विनंती करणार असल्याचे श्री.पाडुळे यांनी सांगितले.
यापूर्वी देखील ग्रामपंचायतीने नागरिकांना गटारी मध्ये सांडपाणी सोडू नये असा अजब प्रकारचा आदेश देणार्या नोटीसा काढल्या होत्या. ज्या नागरिकांचे सांडपाणी गटारी मध्ये येत नाही त्यांना देखील सांडपाणी गावामधील गटारी मध्ये सोडू नका अन्यथा कारवाई करण्यात येईल अशा आशयाचे नोटिसा काढल्या होत्या. पाटोदा गावासारखा विकास करू अशी गावाच्या विकासाची खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या सत्ताधाऱ्यांनी अद्याप पर्यंत ठोस असे विकासाचे काही काम केलेलं नाही नुसता भ्रष्टाचार केलेला आहे. कागदपत्रांमध्ये अफरातफर केलेली आहे. ग्रामसेवक हनुमंत पाटील यांच्या बद्दल गावकऱ्यांमध्ये रोष आहे. नागरिकांना त्रास देणारे भ्रष्ट व औरंगजेबाच्या वृत्तीने वागणारे सत्ताधारी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नको अशी कालठण येथील नागरिकांमध्ये चर्चा आहे.

