shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर येथे महेंद्रदादा रेडके मित्र परिवार व तेजपृथ्वी ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रतीक्षा पाटील यांचा सन्मान सोहळा संपन्न.

इंदापूर येथे महेंद्रदादा रेडके मित्र परिवार व तेजपृथ्वी ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रतीक्षा पाटील यांचा सन्मान सोहळा संपन्न.

 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड साठी अधोमुख श्वानासन या योगमुद्रेमध्ये मध्ये ७५ मीनीटं ४ सेकंदाचा विश्वविक्रम केल्याबद्दल सन्मान.
इंदापूर प्रतिनिधी:दि.३१ जानेवारी २०२२ इंदापूर येथे पंचायत समिती येथे  गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड साठी अधोमुख श्वानासन या योगमुद्रेमध्ये मध्ये ७५ मीनीटं ४ सेकंदाचा विश्वविक्रम केल्याबद्दल महेंद्रदादा रेडके मित्र परिवार व तेजपृथ्वी ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रतीक्षा पाटील या विद्यार्थिनीचा सन्मान करण्यात आला.
 तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने प्रतीक्षा पाटील ला गौरवचिन्ह व सन्मानपत्र देऊन तिचा सन्मान करण्यात आला.
 यावेळेस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र  रेडके, क्रीडा अधिकारी झोळ सर, तसेच प्रतीक्षा पाटील यांचे शिक्षक शिरसागर सर, तिचे आई-वडील हजर होते.
 या कार्यक्रमावेळी विजयकुमार परीट  म्हणाले की, एका शेतकऱ्याची मुलगी विश्वविक्रम करू शकते या पाठीमागे तिच्याबरोबरच तिच्या आईवडिलांची खूप मोठी मेहनत आहे. प्रतिक्षाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. तसेच महिंद्रदादा रेडके व तेजपृथ्वी ग्रुप यांनी नेहमी अशाच चांगल्या गोष्टीचा कौतुकाने सन्मान केला त्याबद्दल गट विकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी त्यांचे हि आभार मानून प्रतिक्षा पाटील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 यावेळेस तेजपृथ्वी  ग्रुपचे मार्गदर्शक नानासाहेब खरात आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाले की, ग्रामीण भागातील मुली जेव्हा स्पर्धा परीक्षा किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवत असतात तेव्हा त्यांना खूप विरोध होतो. कारण ती एक मुलगी असते. मुलींना सर्वात जास्त त्रास स्वतःची जवळच असलेल्यांचा होतो. परंतु प्रतिक्षा च्या आईवडिलांनी कोणाचाही विचार न करता आपल्या मुलीला तिला जे आवडेल त्या क्षेत्रात करिअर करून दिले .यावेळी तिच्या शिक्षकांनी शिरसागर सर यांनी तिने केलेल्या अथक परिश्रमाची माहिती दिली. ही विशेष बाब आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी महेंद्र रेडके यांनी प्रतिक्षा पाटील यांच्या  पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व  काही अडचण आली तरी तिच्या पाठीशी ठाम उभे राहू असे सांगितले.

 घुले सर यांनी आभार मानले तर  झोळ सरांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .

या कार्यक्रमास हनुमंत यमगर, तेजपृथ्वी ग्रुपचे उपाध्यक्ष गणेशभाऊ शिंगाडे, जयवंत रेडके, विस्ताराधिकारी धापटे मॅडम व इतर मान्यवर उपस्थित होते.
close