पूर्णा । प्रतिनिधी :- पूर्णा तालुक्यातील दहा ते पंधरा गावांना दिनांक 13 जानेवारी च्या मध्यरात्री अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी गर्ल्स झाली आहे.
अधिक माहिती अशी की पूर्णा तालुक्यातील गौर सुहागन आवई बरबडी या परिसराला गुरुवारी सायंकाळी मध्ये रात्री अचानक आलेल्या वादळी पावसाने झोडपून काढले. अचानक पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील गुराढोरांना पावसाचा फटका बसला तर तोंडाशी आलेली ज्वारी गव्हाचे पीक आडवे झाले. वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली तर काही काळ तालुक्यातील वीज पुरवठा खंडित झाला होता.
एकंदरीतच अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे शुक्रवारी दिवसभर तालुक्यांमध्ये गारठा दिसून आला परंतु अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका सुहागन, पांगरा, ढोणे या भागाला बसला असून यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे.

