shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज तालुक्यात महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग..!!

 प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि  :- 

आई-वडील बाहेरगावी गेल्याची संधी साधून एका नराधमाने घरात घुसून वाईट हेतूने तिचा हात धरून विनयभंग केल्याची घटना घडली आहे.



या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील तांबवा येथील एका १२ विज्ञान शाखेत शिकत असलेल्या १८ वर्षीय महाविद्यालयीन युवतीचे वडील ड्रायवहार असून ते साखर कारखान्यावर कामाला गेले आहेत. दि. ८ जानेवारी रोजी आई ही नातेवाईकाकडे बाहेरगावी गेले होती. घरी ती व तीचा भाऊ हे दोघे घरी होते म्हणून त्यांच्या शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांना सोबत घेऊन ते रात्री घरात झोपले होते. 

त्या वेळी दि. ९ जानेवारी रविवार रोजी रात्री ३:०० वा. च्या सुमारास तिचा भाऊ हा घराचा दरवाजा उघडून लघुशंकेसाठी गेला होता. त्याची संधी साधून नराधम अक्षय संतोष जंगम रा. कोल्हेवस्ती, तांबवा हा घरात घुसून त्याने त्या युवतीचा वाईट हेतूने हात धरून विनयभंग केला. तिच्या अंगावरील कपडे फाडले. त्यांची झटपट सुरू असताना मदतीला तिने तिच्या भावाला बोलविले असता; त्या नराधमाने तिला तू मला होकार दे; नसता  तिच्या भावाला जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. तिच्या भावाने त्याला धरण्याचा प्रयत्न केला असता; तो शेजातील ज्वारीच्या शेतात पळून गेला. तसेच त्यावेळी त्याच्या सोबत इतर अनोळखी दोन इसम होते.

या प्रकरणी पीडित युवतीच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात अक्षय संतोष जंगम आणि त्याचे साथीदार यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु.र.न. ४/२०२२ भा.दं. वि. ३५४ ३५४ (अ), ४५२, ५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाच्या महिला पोलीस नाईक रुक्मिणी पाचपिंडे या पुढील तपास करीत आहेत.

close