shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

योग प्राणायाममध्ये जागतिक विश्वविक्रम करण्यासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिल्या प्रतिक्षा पाटील यांना शुभेच्छा*

*योग प्राणायाममध्ये जागतिक विश्वविक्रम करण्यासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिल्या प्रतिक्षा पाटील यांना शुभेच्छा*
   इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर तालुक्यातील जांब या गावातील शेतकऱ्याची मुलगी प्रतीक्षा सुनिल पाटील ही योग प्राणायाममध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जागतिक विश्वविक्रम करण्यासाठी प्रयत्नशील असून या तिच्या प्रयत्नाला यश मिळण्यासाठी राज्याचे माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील ठाकरे, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी शुभेच्छा दिल्या असून इंदापूर तालुक्याच्या अभिमानामध्ये मानाचा शिरपेच रोवला जावा यासाठी आपल्या सर्वांच्या शुभेच्छा तिच्या पाठीशी असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले.
   प्रतीक्षा सुनील पाटील योग प्राणायाममध्ये अधोमुख श्वानासन 75 मिनिट 4 सेकंद करून जागतिक विक्रम करण्यासाठी ती सध्या प्रयत्नशील आहे यासाठी राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
  प्रतीक्षा आपल्या जिद्दीच्या व चिकाटीच्या जोरावर तसेच आजपर्यंतच्या अनुभवावरून ती या विश्व विक्रमासाठी नक्कीच गवसणी घालेल असे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
close