"स्मृतिचिन्ह/सन्मानचिन्ह देऊन दावडी ग्रामस्थांनी केला शिबिर कालावधीतील चांगल्या कामाबद्दल श्रीमती. सी के.गोयल कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा सन्मान"
खेड । प्रतिनिधी :-
दावडी ता. खेड जि. पुणे येथे श्रीमती. सी.के. गोयल कला वाणिज्य महाविद्यालय ,दापोडी पुणे -12 राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार संस्कार शिबिर समारोप समारंभ : शनिवार दि.१/१२/२०२२ रोजी सकाळी ९:३० ते ११:०० या वेळेत संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी मा .श्री. विजय शिंदे, मा .श्री. संभाजी घारे,(सरपंच) सौ.राणीताई डुंबरे, पुष्पा मोरे, अनिल नेटके,(ग्रामपंचायत सदस्य) रामदास बोत्रे, गणेश लोणकर, राजाराम कदम, बाळासाहेब वाघिरे,(मा. चेअरमन सोसायटी) मा. श्री आत्माराम डुंबरे (पोलीस पाटील) मा. श्री.रमेश होरे, मा. श्री. बबनराव होले,प्रभारी प्राचार्य डॉ. सुभाष सूर्यवंशी, प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, प्रा. सिद्धार्थ कांबळे, प्रा.दिपाली खर्डे आणि इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामपंचायत दावडी यांच्यावतीने श्रीमती. सी.के. गोयल महाविद्यालयास शिबिर कालावधीतील चांगल्या कामाबद्दल "सन्मानचिन्ह" सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. व सर्व शिबिरार्थींचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन: प्रा. डॉ.बाळासाहेब माशेरे यांनी केले. आभार: सरपंच संभाजी घारे यांनी मानले.
शिबिराच्या समारोप कार्यक्रम: प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. श्री.विजय शिंदे म्हणाले"राष्ट्रीय सेवा योजनेत विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होत असून ग्राम विकासाला निश्चित दिशा मिळत आहे"
दिनांक २६/१२/२०२१ते १ /१२/ २०२२या कालावधीत सात(७ दिवशीय) दिवशीय शिबिरामध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले.
१)श्रमदान उपक्रमअंतर्गत: (सकाळी) ग्रामपंचायत परिसर, माध्यमिक शाळा व जिल्हा परिषद शाळा परिसर, समाज मंदिर परिसर, मशीद परिसर, लक्ष्मी माता मंदिर परिसर, स्मशानभूमी परिसर, गायकवाड वाडा परिसर, चावडी परिसर, दलित वस्ती परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर, पशुवैद्यकीय दवाखाना परिसर, पुनर्वसन वसाहत परिसर, एम. एस. ई .बी. टॉवर परिसर, लक्ष्मी माता मंगल कार्यालय परिसर, इत्यादी सार्वजनिक ठिकाणी परिसर स्वच्छता करण्यात आले.त्याच प्रमाणे वृक्षारोपण करून अस्तित्वात असलेल्या झाडांना आळी करून पाणी देण्यात आले.
सांडपाण्याची व्यवस्था दुरुस्ती, रस्ते दुरुस्ती, जलसंधारण विषय कामे, करण्यात आली.
२) प्रबोधन उद्बबोधन उपक्रम:(दुपारी) अंतर्गत श्री संपत गारगोटे यांचे "शिवछत्रपती "या विषयावर, मा. श्री.सतीश सुरवसे: "कथाकथन" मा. श्री. अतुल सवाखंडे :"सर्प समज-गैरसमज", डॉ.ज्ञानदेव निटवे :"व्यक्तिमत्व विकास", श्री. मनोहर मोहरे: "संस्कार रुजवा जीवन फुलवा", कु. दीक्षा शिंदे:" मी सावित्री बोलतेय"या विषयांवर दुपार सत्रात प्रबोधन सत्रात व्याख्याने संपन्न झाली .
३) सांस्कृतिक कार्यक्रम उपक्रम: (सायंकाळी)मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण जागृती, स्त्रीभृण हत्या जागृती, आरोग्य जागृती, कोविड विषयक जागृती, ग्रामस्वच्छता अभियान विषयक जागृती, वृक्षसंवर्धन याबाबत जागृती, व्यसनमुक्ती बाबत जागृती, आदी विषयांवर प्रसंग नाट्य सादर करण्यात आली,
याशिवाय " वऱ्हाड निघाले लंडनला": मा. श्री. नितीन आंग्रे यांचे एकपात्री अभिनय, श्री. मुकुंद देंडगे यांचा "संमोहन" कार्यक्रम, मिमिक्री विनोदी अभिनयाचे कार्यक्रम, वैयक्तिक नृत्य सामूहिक नृत्य हे कार्यक्रम संपन्न झाले.
४) आरोग्य शिबीर: सत्य साई ट्रस्ट अंतर्गत आरोग्य शिबीर संपन्न झाले.डाॅ.विलास दळवी,श्री.दुसल व्हि.एस,श्री.हुसे बी.डी यांनी ग्रामस्थ व शिबिरार्थींची मोफत आरोग्य तपासणी करुन औषधोपचार केले.
५) वाद्यांच्या गजरात प्रभातफेरी: शिबिरार्थी स्वयंसेवकांनी शेवटच्या दिवशी सकाळी८:०० ते ९:३० या वेळेत दावडी गावात वाद्य गजरात घोषणा देत प्रभात फेरी काढून जनजागृती केली. आणि ग्रामस्वच्छतेचा, आरोग्याचा, वृक्षारोपणाचा, मुलींना शिकवण्याचा, पर्यावरणाच्या रक्षणाचा, कोविड जागृतीचा संदेश दिला. घोषणांनी गावातील परिसर दुमदुमून गेला होता. प्रभात फेरीत गाडगेबाबा ची प्रतिकृती बनवलेला व हातात झाडू जेवण स्वच्छता करणारा विद्यार्थी फिरीचे आकर्षण ठरला. ठिक ठिकाणी महिलांनी गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन केले. ढोल, ताशा, झांझ, टाळ, लेझीम, या वाद्यांचावापर फेरीमध्ये करण्यात आला.
६) इतर नाविन्यपूर्ण उपक्रम: परिसर पाहणी, शिवार फेरी, निमगाव खंडोबा क्षेत्रास भेट, आय.टी.आय. प्रशिक्षण केंद्रास भेट, वृद्धाश्रम व्यसनमुक्ती केंद्रात भेट, पुनर्वसन वसाहतीस भेट, पशुवैद्यकीय दवाखान्यात भेट, औद्योगिक कंपनीस भेट, हेही नाविन्यपूर्ण उपक्रम शिबिरार्थी साठी घेण्यात आले.शिबिरात एकूण ७५ विद्यार्थी सहभागी झाले होते.
शिबिराचे संयोजन प्रा. डॉ.बाळासाहेब माशेरे, प्रा. सिद्धार्थ कांबळे, प्रा.दिपाली खर्डे, यांनी केले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, डॉ.सुभाष सूर्यवंशी, दावडी गावचे सरपंच मा.संभाजी घारे, ग्रामपंचायत सदस्य, हे सोसायटी चेअरमन, सदस्य, पोलीस पाटील, श्रीमंत फत्तेसिंह गायकवाड विद्यालयाचे मुख्याध्यापक, ग्रामसेवक व इतर सर्वांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

