shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुण्यरत्न उपाधीने चंद्रकांत शहासने यांचा गौरव..!


पुणे : दि.२ जानेवारी :- देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने ही व्यक्ती केवळ अष्टपैलू नसून सहस्त्रपैलू आहे असे गौरवोद्गार पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी पर्वती हरितक्रांती संघटनेने आयोजित कार्यक्रमात काढले.
वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, पर्यावरण रक्षण, औषधाशिवाय रोगमुक्ती, गाथा भीमरावांची अर्थात बहिष्कृतांचा स्वातंत्र्यसंग्राम व केशव प्रताप अशा दोन महाकाव्याची रचना , गोमूत्र/गोमयातून विविध औषधांचे संशोधन, मनोवैज्ञानिक संत लेखमाला, संत वांग्डमयावर विज्ञाननिष्ठ लेखन व प्रवचने, १०,००० क्रांतीकारकांची माहिती देणाऱ्या देशभक्तकोशाचे लेखन, राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाचे आयोजन, कला, सेवा या अशा सर्वच प्रकारच्या निर्मितीमध्ये चंद्रकांत शहासने यांनी यशस्वी कामगिरी केलेली आहे. यामुळे खऱ्या अर्थाने पुण्यरत्न ही उपाधी चंद्रकांत शहासने यांना शोभून दिसते असे उद्गार पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी काढले.

समारंभाचे अध्यक्ष वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे म्हणाले की पुण्यरत्न उपाधी चंद्रकांत शहासने यांना देण्यात येत आहे  व ज्या पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते ही पदवी दिली जात आहे या दोन्ही व्यक्ती आजच्या या परिस्थितीत ऋषितुल्य आहेत. त्यामुळे या पदवीची उंची फार मोठी आहे. 

 बहुआयामी कर्तृत्वाबद्दल देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने यांना पुण्यरत्न ही पदवी देऊन गौरविण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशासकीय अधिकारी  वनसंरक्षक रंगनाथजी नाईकडे हे होते. कार्यक्रमाचे नियोजन पर्वती हरित क्रांती संस्थेचे कार्यकर्ते रवी कुलकर्णी, गोडबोले,.... केले , या समारंभात पर्यावरण रक्षणासाठी कार्य करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांचे सत्कार करण्यात आले. सूत्रसंचालन विजय सातपुते यांनी केले.
close