1 लाख 28 हजार 750 रुपये किमतीचे कच्चे रसायन व दारू जप्त; दोन महिलांसह तिघे तताब्यात..!!
शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ०८ फेब्रुवारी २०२२
टाकळीभान येथील हातभट्टी दारू अड्ड्यांवर छापे
1 लाख 28 हजार 750 रुपये किमतीचे कच्चे रसायन व दारू जप्त; दोन महिलांसह तिघे तताब्यात..!!
श्रीरामपूर : तालुक्यातील टाकळीभान येथील अवैध हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर छापे टाकले. या छाप्यात पोलीस पथकाने 1 लाख 28 हजार 750 रुपये किंमतीचे दारु बनवण्याचे कच्चे रसायन जप्त केले असून तयार दारू नष्ट करत तिघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टाकळीभान येथील लक्ष्मण परसराम बिरसने, रा. टाकळीभान, ता. श्रीरामपूर 45,500 रुपये किमतीचे 650 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, 1500 रुपये किमतीची 15 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू (आंबट उग्र वासाची), आरोपी शांताबाई गणपत जाधव, रा. गावठाण टाकळीभान तालुका श्रीरामपूर 42,000 रुपये किमतीचे 600 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन,1500 रुपये किमतीची 15 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू आंबट उग्र वासाची, आरोपी आशाबाई शिवाजी पवार, रा. गावठाण, टाकळीभान तालुका श्रीरामपूर 36,700 रुपये किमतीचे 525 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, 1500 रुपये किमतीची 15 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू (आंबट उग्र वासाची) असा एकूण 1,28,750 रुपये किमतीचा वरील वर्णनाचा प्रोव्हिविशन गुन्ह्याचा माल आरोपींचे ताब्यातून जप्त केला आहे. सर्व आरोपींविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे, मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 (फ) (क) (ड) (ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या छाप्यात लक्ष्मण परशराम बिरसने, शांताबाई गणपत जाधव व आशा शिवाजी पवार यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात मुंबई दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागिय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र आरोळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश औटी, पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ यांनी ही कारवाई केली आहे. यापुर्वीही टाकळीभान येथे मोठी कारवाई करण्यात आली होती.
अचानक झालेल्या या कारवाईमुळे टाकळीभान परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून सदर कारवाईबद्दल टाकळीभान येथील महिलांनी डिवायएसपी संदीप मिटके व त्यांच्या पथकाचे कौतुक केले आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

