shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ट्रॅक्टर चोरणारी टोळी जेरबंद ; श्रीगोंदा पोलिसांची कारवाई..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 मंगळवार दिनांक ०८ फेब्रुवारी २०२२   

अहमदनगर : ट्रॅक्टर चोरणारी टोळी पकडून सहा लाखांचा मुद्देमाल पकडण्यात श्रीगोंदा पोलिसांना यश आले आहे. अतुल विश्वनाथ सुद्रिक (वय 26), निलेश मच्छिंद्र सुद्रिक (वय 28), माउली बबन गवारे (वय 19 , सर्व रा. कोपर्डी ता. कर्जत जि.अ.नगर) असे पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत.

जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोनि रामराव ढिकले यांच्या सूचनेनुसार सपोनि दिलीप तेजनकर, सफौ अंकुश ढवळे, पोना गोकुळ इंगवले, पोकॉ प्रकाश मांडगे, पोकॉ किरण बोराडे, पोकॉ दादासाहेब टाके, पोकॉ अमोल कोतकर, पोकॉ प्रशांत राठोड आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

याबाबत समजलेले माहिती अशी की, दि. 21 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री त्यांच्या मालकीचा स्वराज कंपनीची ट्रक्टर ट्रॉलीसह घरासमोरुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेला आहे. या,झुंबर हरी कोंथिबीरे (रा.साळवणदेवी रोड,श्रीगोंदा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गु.रजि. नं. 44 /2022 भा.द.वि.क.379 प्रमाणे दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास चालू असताना दि. 7 फेब्रुवारी 2022 रोजी श्रीगोंदा पोलीस ठाणेचे पोनि रामराव ढिकले यांना माहिती मिळालेल्या माहीतीवरुन त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना सूचना दिल्या. पोलिस पथक रवाना झाले, यानंतर अतुल विश्वनाथ सुद्रिक, निलेश मच्छिंद्र सुद्रिक, माउली बबन गवारे (सर्व रा. कोपर्डी ता. कर्जत) यांनी केल्याबाबत माहीती मिळाली. त्यावरुन गुन्हे प्रकटीकरण पथकाने आरोपींना कोपर्डी येथून ताब्यात घेतले. त्यांचेकडे गुन्ह्याचे अनुशंगाने कसून चौकशी केली असता, त्यांनी सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली. या दरम्यान गुन्हाची कबुली देऊन चोरी केलेला 6 लाख रुपये किंमतीचा स्वराज ट्रॅक्टर व ट्रॉली असे कोपर्डी कर्जत येथून हस्तगत करण्यात आला आहे. स्वराज कंपनीचा लाला रंगाचा ट्रक्टर व ट्रॉली (एम. 16 सी. क्यु. 5115) असा मुद्देमाल आहे.
ट्रक्टर चोरीच्या टोळीचा मुख्य सुत्रधार अतुल विश्वनाथ सुद्रीक याचेविरुध्द कर्जत पोलीस ठाण्यात गु.रजि.नं. 313 /2018 भा.द.वि.क.302 प्रमाणे दाखल आहे. आरोपी पोलीस कस्टडीमध्ये असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक गोकुळ इंगावले हे करीत आहेत.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600



close