अनेक भाविकांनी घेतले पादुकांचे दर्शन...
श्रीरामपूर ( शौकतभाई शेख) - अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांचे दरवर्षी प्रमाणे यंदाही श्रीरामपूर शहरात मोठ्या उत्साही आणि मंगलमय वातावरणात आगमन झाले,या निमित्ताने अनेक स्वामी भाविकभक्तांनी मनोभावे स्वामींच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेतला,
महाराष्ट्रातील अबाल वृध्दांना, बालगोपाळांना व स्वामी भक्तांना दर्शनचा लाभ व्हावा म्हणुन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र छत्र मंडळ (ट्रस्ट) यांच्यावतीने गेल्या २६ वर्षांपासून श्री स्वामी समर्थ महाराज पादुका पालखी सोहळा आयोजीत केला जातो मात्र मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट असल्याने पालखीचे नियोजन झाले नाही, मात्र यावर्षी स्वामी भक्तांनच्या आग्रहाखतर फक्त या वर्षी स्वीमी पादुकांच्या दर्शनाचे नियोजन केले होते,
पादुकांचे श्रीरामपूर शहरात आगमन होताच बेलापूर रोडवरील वेशी जवळच ट्रस्टचे अध्यक्ष विजय नगरकर व माणिक जाधव यांनी हार अर्पण करून स्वागत केले,
नंतर डावखर रोडवरील व्यापारी मंगल कार्यालय याठिकाणी आदित्य नगरकर व सौ निकिता नगरकर यांच्या हस्ते पादुकांची पुजा व आरती करण्यात आली,
नंतर सर्व स्वामी भक्तांनी दर्शनाचा आणि दर्शन झाल्यावर प्रसादाचा लाभ घेतला,
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदिप अग्रवाल, दिपक अग्रवाल, बंटी अग्रवाल, त्रिलोकनाथ अग्रवाल, पुरूषोत्तम झंवर, बापूसाहेब जौक, बाळकृष्ण कुलकर्णी, रामनारायण झंवर, नंदकुमार गोखले, बन्शी फेरवाणी, रविंद्र सोनी, सचिन धुत,सोनु महाले, प्रशिक्षित मोरे, अतुल गोपाळे,पंडीत मॅडम, बंटी थापर, सोमनाथ बोरकर चांगदेव मांडण, अनिल पांडे,राजेश शहा, आदिनी विशेष परीश्रम घेतले.


