shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कवी डाॕ.लक्ष्मण हेंबाडे यांचा पांदवाट काव्यसंग्रह 13 फेब्रुवारीला प्रकाश सोहळा..!


पन्हाळा/प्रतिनिधी(सुरेश वडर):  डोंगरगाव(ता.मंगळवेढा)येथील कवी डाॕ.लक्ष्मण हेंबाडे. यांचा पांदवाट काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा सदगुरु गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालय डोंगरगाव व महाराष्ट्र साहित्य परिषद पूणे शाखा मंगळवेढा,हेंबाडे परिवार यांच्या वतीने हिरकणी पॕलेस हाजापूर रोड डोंगरगाव येथे रविवार दि.13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता खालील मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे.

      मुंबई येथील जेष्ट प्रसिध्द हास्य कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते,काॕग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष नंदकूमार पवार यांच्या अध्यक्षतेखाली आमदार समादानदादा आवताडे,राजमाता बॕंकेचे चेअरमन डाॕ.अशोक सुरवसे,धनश्री परिवाराचे संस्थापक प्राध्यापक शिवाजीरव काळुंगे,रतन चंद शहा सहकारी बॕंकेचे चेअरमन राहुल शहा,उधोगपती अभय हजारे,मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव,वाशी येथील वैधकीय अधीक्षक डाॕ.प्रमोद शिंदे,ग्रंथ मित्र  सुरेश फडके,वाघिरे काॕलेज पूणे येथील मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.मीरा देशमुख चिकने,हजरत काझी,बजरंग दत्तु,कवी शिवाजीराव सातपुते,सुमने मंचचे अध्यक्ष कवी हेमंत रत्नपारखे,कवी अशोकजी उन्हाळे,कवी सुरेश वडर,सी.बा.यादव प्रतिष्ठानचे जेष्ट पत्रकार गणेश यादव,या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे.

       या कार्यक्रमास मंगळवेढा शहर व ग्रामीण परिसरातील सर्व साहित्य प्रेमिकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहान मसाप शाखा मंगळवेढा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
close