शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२२
पाथर्डीत भरदिवसा दोन ठिकाणी धाडसी घरफोड्या..!!
भरदिवसा होणारे हे असले प्रकार आता पोलिसांसमोर आव्हान..
अहमदनगर : जिल्ह्यात मागील काही दिवसांत अनेक गुन्हेगारी घटना समोर येत आहेत. यात धाडसी दरोडे, चोऱ्या आदी अनेक घटना घडल्या आहेत.
दरम्यान जिल्ह्यात चोरट्यांचा चांगलाच सुळसुळाट झाल्याचे दिसते. कारण मागील काही घटना ताजा असतानाच आता आणखी धाडसी घरफोड्याचे वृत्त आले आहे.
पाथर्डी तालुक्यात बुधवारी (दि.9) मोहटे व चिंचपुर पांगुळ या दोन गावात एकाच दिवशी भरदिवास चोरी करण्यात आली. यात चोरट्यांनी साडेपाच लाखांचा ऐवज लंपास केला आहे.
मोठ्या शहरांमध्ये होणारे हे प्रकार ग्रामिण भागात होऊ लागल्याने वाढत्या घरफोड्यांनी नागरीक हैराण झाले आहेत. मोहटे गावातील अंबादास अश्रू दहिफळे यांच्या घरी बुधवारी अर्थात काल भर दुपारी घरफोडीची घटना घडली.
दहिफळे यांच्या घरातील सदस्य शेतात कामाला गेले. दुपारी बारा ते तीन वाजण्याच्या दरम्यान घराचा दरवाजाचे कुलूप तोडून घरातील सामानाची उचकापाचक अज्ञात आरोपीने करून पेटीमध्ये ठेवलेले रोख रक्कम अडीच लाखाची रोकड आणि दोन लाख छपन्न हजारांचे सोन्याचे दागिने
यामध्ये अंगठ्या, चैन, पुतळ्या, बोरमाळ, नथ, मंगळसूत्र असा एकूण सुमारे दहा तोळे सोन्याचे दागिन्यांचा समावेश आहे. तर दुसर्या एका घटनेत चिंचपूर पांगुळ येथील डॉ. अशोक मुरलीधर बडे यांच्या राहत्या घरी भरदिवसा चोरी झाल्याची घटना घडली आहे.
बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने बासष्ट हजाराचा ऐवज पळवला आहे. बारा हजार रोख रक्कम आणि पन्नास हजारांचे सोन्याचे दागिने चोरट्याच्या हाती लागले आहेत.
तो ऐवज घेऊन चोरट्याने पोबारा केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
भरदिवसा होणारे हे असले प्रकार आता पोलिसांसमोर आव्हान उभे करत आहेत.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

