ताडकळस ' प्रतिनिधी :- पुर्णा तालुक्यातील मजलापुर येथील 23 वर्षीय युवक शेतकरी यांनी दि,12 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास स्वताच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आसुन या घटनेची माहिती मिळताच ताडकळस पोलीस ठाण्याचे सपोनि भाले साहेब, व पोलीस कर्मचारी प्रभाकर राठोड, धंनजय कनके ,हानुमान पावडे यांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनेचा पंचनामा केला असून ताडकळस पोलीस ठाण्यात दि ,13 फेब्रुवारी रोजी या शेतकरी आत्महत्या गुन्हाची नोंद करण्यातआली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की ताडकळस पोलीस ठाण्याच्या हाद्दीतील मजलापुर ता पुर्णा जि परभणी येथील मयत रमेश सदाशिवराव जाधव वय 23 वर्षे धंदा शेती रा मजलापुर यांनी सततच्या नापिकीमुळे व अतिवृष्टी झाल्यामुळे व वडिल यांच्या नावावरील आसलेल्या शेतीवर भारतीय स्टेट बँक शाखा नवा मोंढा परभणी येथील बँकेचे अंदाजे कर्ज 2 लाख रुपये हे कर्ज कशे फेडावे या चिंतेत राहून दि,12 फेब्रुवारी रोजी रात्री स्वताच्या शेतात गट क्र, 46 मधे 3 एकर शेती आसुन स्वतःच्या शेतातील आंब्याच्या झाडाला सुताच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली, असल्याची फिर्याद आर्जुन व्यकंटराव जाधव रा मजलापुर यांनी ताडकळस पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून दि,13 फेब्रुवारी रोजी शेतकरी आत्महत्या केली आहे
म्हणून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा तपास ताडकळस पोलीस ठाण्याचे सपोनि भाले साहेब यांच्या मार्गदर्शना खाली जमादार प्रभाकर राठोड, धनंजय कणके, हे पुढील तपास करीत आहेत.ताडकळस प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ वैभव कांबळे यांनी मयताचे शिव्छदन केले मयताच्या पचायात आई,वडील,भाऊ अशा परीवार आहे.

