shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

परभणी रेल्वे स्थानकावर सापडला तरुणाचा मृतदेह..!

परभणी/प्रतिनिधी- येथील रेल्वे स्थानकाच्या जवळच एका २२ वर्षिय युवकाचा दि १३ फेब्रुवारी रोजी आढळून आला आहे. सदरील मयत युवकाच्या अंगात पांढरा शर्ट व काळी पॅंट असून तो औरंगाबाद येथील राजू डहाळे असल्याचा पोलीसांनी सांगितले आहेत.  त्याचा घातपात दिसून येत आहे. परभणी रेल्वे स्थानकावर यावरुन गुन्हेगारी पसरली असल्याचे बोलले जात आहे. 

पोलीसांचा रेल्वे स्थानक परिसरात  गुन्हेगारावर वचक नसल्याने असे गंभीर प्रकार घडत आहेत.सदरील युवकाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी तपास करीत आहेत. सदर युवकाच्या नातेवाईक यांनी परभणी रेल्वे स्थानक येथे  संपर्क करावा असे सांगितले आहे. तसेच असे गुन्हे घडू नयेत. यासाठी पोलीसांची गस्त रेल्वे स्थानक व आजु बाजूला परिसरात गस्त सतत चालू ठेवावी असी मागणी होत आहे.
close