shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

30 एकरांहून अधिक ऊस जळून खाक, लोणी-हनुमंतगाव रस्त्यालगतची घटना..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक ०४ फेब्रुवारी २०२२ 
 
30 एकरांहून अधिक ऊस जळून खाक, लोणी-हनुमंतगाव रस्त्यालगतची घटना..!!

शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळून खाक; शेतकर्‍यांला आर्थिक भुर्दंड..


राहाता : तालुक्यातील लोणी बुद्रुक गावातील चारी क्र.15 व हनुमंतगाव रस्त्यालगतचा 30 एकरांहून अधिक ऊस गुरुवारी दुपारी आगीच्या भक्षस्थानी पडला. मात्र या आगीचे कारण समजू शकले नाही.
        भर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तोडणीला आलेल्या उभ्या उसाच्या पिकाला आग लागली. आगीचे लोळ आणि प्रचंड धूर दिसू लागल्याने आजूबाजूच्या शेतकर्‍यांनी धावाधाव सुरू केली. त्यातच जोराचे वारे वाहत असल्याने आगीला इतरत्र पसरण्यास मदत झाली. चारी क्र. 15 भागातील विखे वस्तीवरून आगीला सुरुवात झाली. वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असल्याने आग लोणी-हनुमंतगाव रस्त्यालगतच्या भागाकडे वेगाने पसरू लागली.जागरूक शेतकर्‍यांनी विखे पाटील साखर कारखान्यावर माहिती देऊन अग्निशमन दलास पाठवण्यासाठी निश्चित ठिकाणाची माहिती दिली. विखे, गणेश, राहुरी कारखान्याबरोबरच राहाता नगरपालिकेची अग्निशामक घटनास्थळी आल्या. अरुंद रस्ते आणि जेथे आग लागली होती तिथे जाण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागली.

        स्थानिक शेतकरी, शेतमजूर यांनी शक्य होईल तेवढे प्रयत्न करून आग विझवण्याचा प्रयत्न केला.विखे कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी येऊन परिस्थिती हाताळत होते. अखेर चार-पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. 

       या आगीमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. ऊस पिकांबरोबरच शेतातील ठिबक सिंचन संच, पाईप लाईन, विद्युत पंपाच्या केबल आदींचे नुकसान झाले. 

    विखे कारखान्याने जळालेल्या उसाची तातडीने तोडणी करण्यासाठी खास व्यवस्था केली असून लवकरात लवकर ऊस गाळपासाठी नेण्याचा प्रयत्न आहे.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600



close