शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ०१ फेब्रुवारी २०२२
वडगावपान शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार..!!
तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील वडगावपान शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार झाला. सोमवारी ( दि. ३१ जानेवारी ) रात्री ९ वाजेच्या सुमारास लोणी ते संगमनेर रस्त्यावर ही घटना घडली.
अधिक माहिती अशी, वडगावपान शिवारात रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्या अज्ञात वाहनाची धडक बसली. त्यामुळे गंभीर जखमी होत बिबट्या जागीच ठार झाला. या घटनेची माहिती स्थानिक रहिवाशांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर वनक्षेत्रपाल आधिकारी एस. एस. माळी, वनरक्षक एस. एम. पारधी, वनरक्षक विठ्ठलसींग जारवाल, पी. जे. पुंड, दत्तात्रय पर्बत यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत बिबट्याला मंगळवारी सकाळी निंबाळे रोपवाटिकेत हलविले. पशुवैद्यकीय आधिकारी यांनी शवविच्छेदन केल्यानंतर बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याने वडगावपान शिवारात बिबट्याचे वास्तव्य अधोरेखित झाले आहे. तर यापूर्वीही अशाच पद्धतीने बिबट्यांना कोल्हार घोटी राज्यमहामार्ग, पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गांवर वारंवार अज्ञात वाहणाच्या धडकेत आपले जीव गमवावे लागले आहे. अज्ञात वाहनांच्या धडकेत बिबट्यांचा मृत्यू होवू नये म्हणून वनविभागाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी व्यन्य प्राणीप्रेमी नागरिकांनी केली आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

