shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पोहोण्यासाठी गेलेल्या तरूणाचा नदीपात्रात बुडून मृत्यू..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 मंगळवार दिनांक ०१ फेब्रुवारी २०२२   

पोहोण्यासाठी गेलेल्या तरूणाचा नदीपात्रात बुडून मृत्यू..!!

राहुरी  : राहुरी तालुक्यातील पिंप्री-वळण येथील मुळा नदीपात्रात पोहोण्यासाठी गेलेल्या 35 वर्षीय इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अनिल दिगंबर जाधव असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे वळण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सोमवारी दुपारच्या दरम्यान वळण मुळा नदीपात्रात हा इसम पोहोण्यासाठी गेला असता पाण्याच्या अंदाज न आल्याने तो बुडू लागला. तेथील धुणे धुणार्‍या महिलांनी बघितले असता त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र, तोपर्यंत त्याचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच स्थानिकांनी नदीपात्राकडे धाव घेत मृतदेह बाहेर काढला आहे.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close