shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; पेट्रोल-डिझेल महागणार!..!!


शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 मंगळवार दिनांक ०१ फेब्रुवारी २०२२   

सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; पेट्रोल-डिझेल  महागणार!..!!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी त्यांनी अनेक घोषणा देखील केल्या. मात्र या घोषणा करत असताना त्यांनी एक घोषणा अशी केली की, त्याकडे कुणाचंही लक्ष गेलं नाही. अन्य घोषणांच्या गर्दीत या घोषणेकडे बऱ्याच जणांचं दुर्लक्ष झालं. ही घोषणा पेट्रोल डिझेल संदर्भातील होती.


अर्थसंकल्पात पेट्रोल डिझेल संदर्भात बोलतांना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, 1 ऑक्टोबर 2022 पासून स्वच्छ इंधनावर (नॉन-मिश्रित) प्रति लिटर 2 रुपये अबकारी शुल्क आकारण्यात येणार आहे. याचाच अर्थ पेट्रोल डिझेलच्या दरात 1 ऑक्टोबरपासून 2 रुपयांची वाढ होणार आहे. म्हणजेच काय तर इंधन दरवाढीबाबत वाहनधारकांना कोणताही दिलासा मिळणार नाहीये. नॉन-मिश्रित इंधनामध्ये एक्स्ट्रा प्रिमियम सारख्या पेट्रोलचा समावेश आहे.
 सिलिंडर झाला स्वस्त; महिन्याच्या सुरूवातीलाच दरात मोठी कपात, वाचा लेटेस्ट दर


 
2020 मध्ये, केंद्र सरकारने कोरोना संकटाच्या काळात आपली तिजोरी वाढवण्यासाठी उत्पादन शुल्काच्या रूपात एक चांगला मार्ग शोधला. त्यामुळे महसूल वाढला, पण इंधन महाग झाले. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे टीकेला सामोरे जाणाऱ्या केंद्र सरकारने नोव्हेंबर 2021 मध्ये उत्पादन शुल्कात कपात केली होती. ही कपात फेब्रुवारी 2021 पर्यंत करण्यात आलेल्या वाढीच्या केवळ 15-30 टक्के होती.



दरम्यान, आज मंगळवारी 1 फेब्रुवारीसाठी सरकारी तेल कंपन्यांनी IOCL ने बजेटआधी पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले होते. त्यानुसार आज पेट्रोल डिझेलच्या दरात कुठलीही वाढ अथवा घट झालेली नाही. मागील जवळपास 3 महिन्यांपासून इंधन दर स्थिर आहेत.


देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close