shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मोठमोठे आकडे आणि गुलाबी स्वप्ने, निव्वळ संकल्प, बाकी अर्थहीन; बाळासाहेब थोरातांची टीका.!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 मंगळवार दिनांक ०१ फेब्रुवारी २०२२   

मोठमोठे आकडे आणि गुलाबी स्वप्ने, निव्वळ संकल्प, बाकी अर्थहीन; बाळासाहेब थोरातांची टीका..!!

केंद्राचा अर्थसंकल्प म्हणजे खोदा पहाड निकला चूहा - मंत्री छगन भुजबळ..!!


संगमनेर : मोदी सरकारने आपल्या नेहमीच्या पद्धतीने या बजेटमधून मोठमोठे आकडे फेकून भव्य दिव्य स्वप्न दाखवली आहेत. गुलाबी स्वप्नांशिवाय सर्वसामान्यांना काहीही मिळाले नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन, या अर्थसंकल्पाची मांडणी केली गेली आहे. पुन्हा एकदा डिजीटल स्वप्न दाखवून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केला असून त्यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प सर्व वर्गाची घोर निराशा करणारा दिशाहीन व अर्थहीन संकल्प आहे, अशी प्रतिक्रिया विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पावर बोलताना ना. थोरात म्हणाले की, सरकारी कंपन्या विकणे, टॅक्स आणि इंधनाचे दर वाढविणे यापलीकडे केंद्र सरकारकडे दुसरे काही धोरण नाही. सरकारी पैशांतून व्यवस्था उभ्या करायच्या आणि पुन्हा त्या विकायच्या हेच, मागील सात वर्षात सुरु आहे आणि तेच भविष्यातही सुरु राहणार आहे यावर आजच्या अर्थसंकल्पातून शिक्कामोर्तब केले आहे. मोदी सरकारने गेल्या सात वर्षांत सादर केलेले अर्थसंकल्प बघितले तर, ते कायमच अर्थसंकल्पातून भविष्याची स्वप्न दाखवत आले आहे. मात्र गेल्या सात वर्षात काय केले हे सांगत नाही. 100 स्मार्ट सिटी, सांसद आदर्श ग्राम योजनेची काय स्थिती आहे? यावर सरकार चूप आहे. मुद्रा लोन, स्टार्टअप योजना याविषयी यापूर्वी केलेल्या घोषणांवर सरकार बोलत नाही. गेल्या अर्थसंकल्पातील घोषणांचे काय झाले ते ही अर्थमंत्र्यांनी सांगितले नाही.
मोठमोठे आकडे आणि गुलाबी स्वप्ने, निव्वळ संकल्प, बाकी अर्थहीन; बाळासाहेब थोरातांची टीका..!!!


Budget 2022 : या अर्थसंकल्पातून काय मिळाले? वाचा -

मुळात कोविडच्या या संकट काळात देशातील जनता मोठ्या आर्थिक संकटातून जाते आहे, छोटे उद्योजक, हातावर पोट असणारे गाव खेड्यातील व्यावसायिक यांची स्थिती अत्यंत कठीण झाली आहे, त्याबाबत केंद्र सरकारकडे कोणतेही धोरण सरकारचे दिसत नाही. कोविड मध्ये जीव गमवावा लागलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांपर्यंत केंद्र सरकार सरसकट मदत करेल अशी अर्थसंकल्पाकडून अपेक्षा होती, त्याबद्दल चकार शब्दही अर्थमंत्र्यांनी काढला नाही.
एकीकडे बेरोजगारी आजवरच्या सर्वोच्च पातळीवर पोहचली आहे, दुसरीकडे रोजगार निर्मितीचे स्वप्न दाखविले जाते आहे. आहे त्या नोकर्‍या टिकविण्यासाठी सकारात्मक धोरणाचा अर्थसंकल्पात अभाव दिसतो. देशातील बेरोजगारी ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोहोचली असताना ती कमी करून तरूणांना रोजगार देण्याबाबत कोणताही ठोस रोडमॅप न तयार करता केवळ घोषणा करायची म्हणून 60 लाख नोक-या देण्याची घोषणा करून बेरोजगार आणि तरुण मतदारांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न केला आहे.


या अर्थसंकल्पातून शेतकरी, कष्टकरी, कामगार, मध्यमवर्ग, छोटे व्यापारी, बेरोजगार तरूण, विद्यार्थी, महिला, दलित, अल्पसंख्यांक यांना काहीही मिळाले नाही. निवडक उद्योगपती मित्र सोडता समाजातील सर्व वर्गाची घोर निराशा या अर्थसंकल्पाने केली आहे. थोडक्यात हा मोदी सरकारने आपल्या स्वभावाप्रमाणे केलेला संकल्प आहे, जो पूर्ण करण्यासाठी ते बांधील नाही. सात वर्षातही तसे कधी झाले नाही, किंबहूना ते करण्याचा प्रयत्नही झाला नाही हेच सत् य असून बाकी सर्व अर्थहीन आहे! असेही ना. थोरात म्हणाले.

सर्व सामान्यांचा भ्रमनिरास करणारा अर्थसंकल्प - आ.डॉ.तांबे..!!

केंद्र सरकारने सन 2021 - 2022 करिता सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांचा पुर्णपणे भ्रमनिरास करणारा ठरला आहे. महाराष्ट्र हे देशाला सर्वात जास्त कर देणारे राज्य असून या अर्थसंकल्पात महाराष्ट्र व मुंबईकडे केंद्राने पुर्णतहृ दुर्लक्ष केले आहे. 2014 ला शेतकर्‍यांचे उत्पन्न दुपट्ट करण्याची घोषणा केली होती तीच घोषणा आता पुन्हा केली आहे. या अर्थसंकल्पात नविन काहीही नसून मध्ये गोर गरिब सर्वसामान्य, कामगार, कष्टकरी यांचेकडे दुर्लक्ष केले आहे. आर्थिक मंदी व बेरोजगारी हटविण्याबाबद या सरकारने कोणत्याही ठोस उपाययोजना केली नसून फक्त आश्‍वासनांची खैरात केली असून या आश्‍वासनांसाठी पैसे आणणार कुठून असा मोठा प्रश्‍न असून या अर्थसंकल्पातून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नसल्याची प्रतिक्रिया आ.डॉ.सुधीर तांबे यांनी दिली आहे.

युवकांसाठी निराशाजनक अर्थसंकल्प - सत्यजीत तांबे.

17 लाख कोटी रु. त्रुटीच्या अर्थसंकल्पाने मध्यमर्गीय, शेतकरी व तरुणांचा भ्रमनिराश केला आहे. 2 कोटी युवकांना नोकर्‍या देण्याचे आश्‍वासन हवेत विरले.किती युवकांना मुद्रा लोन व केंद्र सरकारच्या माध्यमातून उद्योगधंदे करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले याचा कुठेही उल्लेख नाही. सर्वसामन्यांकडून टॅक्स गोळा करुन श्रीमंत व भांडवलदारांना फायदा करुन देणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600




close