shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वाडेगव्हाणच्या युवकांनी जपला गावचा ऐतिहासिक वारसा..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 मंगळवार दिनांक ०१ फेब्रुवारी २०२२   


वाडेगव्हाणच्या युवकांनी जपला गावचा ऐतिहासिक वारसा ; प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव..!!

पारनेर : पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील ऐतिहासिक जुन्या वेसीचे गावातील तरुणांच्या पुढाकाराने सुशोभीकरण करून या वेसीला छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे नाव देण्यात आले आहे. या वेसीचे सुशोभीकरण केल्यामुळे गावाच्या वैभवात भर पडली आहे.
नगर -पुणे रस्त्यावर असलेले शिरूरकडून नगरला जात असताना 8 किलोमीटर वर वसलेले ऐतिहासिक गाव वाडेगव्हाण. गावात जाण्याआधी महेश्वरी नदी लागते, सध्या या नदीचे पात्र लहान झाले आहे. नदीच्या कडेला असलेले शिवशंकराचे मंदिर, त्यानंतर प्रवेशद्वारावर असलेली मुख्य वेस गावचे वैभव. आता या वेशीचे सुशोभीकरण केल्यामुळे ही वेस सर्वांचेच आकर्षण बनली आहे.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600



close