shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भटक्या विमुक्त जाती जमाती व गोरगरीब लोकांसाठी घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना द्यावेत - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली अण्णासाहेब धोत्रे यांनी मागणी.

भटक्या विमुक्त जाती जमाती व गोरगरीब लोकांसाठी घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना द्यावेत - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली  अण्णासाहेब धोत्रे यांनी मागणी.

राज्यमंत्री भरणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त जाती जमाती इंदापूर तालुका सेलच्या वतीने   घरकुलासाठी जागा मिळण्यासंदर्भात देण्यात आले मागणी पत्र.
इंदापूर प्रतिनिधी:भटक्या विमुक्त जाती जमाती सेल च्या वतीने भटक्या विमुक्त जाती जमाती व गोरगरीब लोकांसाठी घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना द्यावेत व भटक्या विमुक्त जाती जमाती तसेच गोरगरीब लोकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त जाती जमाती सेलचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब धोत्रे यांनी मागणी पत्र(दि. १३ ) रोजी दिले.
यावेळी प्रताप पाटील,
 इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्षअतुल झगडे , उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर,  पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे,सागर मिसाळ ,सचिन चव्हाण, संजय चव्हाण, करगळ,
भटक्या-विमुक्त जाती-जमाती सेलचे नाथासाहेब चौगुले व गणेश वाघमोडे तसेच सर्व सेलच्या पदाधिकारी  उपस्थित होते.


घरकुलसाठी जागा मिळण्यासंदर्भात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे भटक्या विमुक्त जाती जमाती सेलचे इंदापूर तालुका अध्यक्ष अण्णासाहेब धोत्रे यांनी 
पत्र दिले असून या पत्रात म्हटले आहे की, २०२१- २२ मध्ये मिळालेली नवीन घरकुले जागेअभावी बांधकाम झालेली नाहीत. सदरची घरकुले आपल्या तालुक्यातील भटक्या  विमुक्त जाती जमाती तसेच गोर गरीब लोकांचे बहुंताश घरकुले आहेत. काही गावी पुनर्वसन मध्ये आहेत व काही गावात गायरान जमिनी आहेत. सदर जागेवरती आपण घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना द्यावेत व भटक्या जाती जमाती तसेच गोरगरीब लोकांना न्याय मिळवून द्यावा असे मागणी पत्र राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिनांक १३ फेब्रुवारी २०२२ रोजी अण्णासाहेब धोत्रे यांनी दिले.
close